Ajinkya Rahane news in marathi  sakal
Cricket

Ranji Trophy : रणजी सामन्यादरम्यान मोठा ड्रामा, आउट दिल्यानंतरही कर्णधार रहाणे पुन्हा आला फलंदाजीला

Ranji Trophy Ajinkya Rahane : देशांतर्गत क्रिकेटमध्ये रणजी ट्रॉफीत चाहत्यांना दररोज रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत.

Kiran Mahanavar

Ranji Trophy Ajinkya Rahane : देशांतर्गत क्रिकेटमध्ये रणजी ट्रॉफीत चाहत्यांना दररोज रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. रणजी ट्रॉफीमध्ये मुंबई आणि आसाम यांच्यात सामना सुरू आहे. या सामन्यात मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आसामचे फलंदाज पहिल्या डावात फ्लॉप ठरले आणि संपूर्ण संघ 84 धावांत आटोपला. यानंतर मुंबईचा संघ फलंदाजीसाठी उतरला तेव्हा मैदानावर वेगळाच ड्रामा पाहायला मिळाला.

झालं असं की, आसामविरुद्ध मुंबई संघ चार गडी गमावून 102 धावा करून खेळत होता. आणि संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेची वैयक्तिक 18 धावांवर खेळत होता. यानंतर त्याने चेंडू मिड-ऑनच्या दिशेने खेळून सिंगल घेण्याचा प्रयत्न केला, पण शिवम दुबेने पळण्यास नकार दिला. रहाणे खूप पुढे आला होता आणि आसामचा कर्णधार दानिश दासने चेंडू उचलून यष्टिरक्षकाकडे फेकला, पण तो क्रीझवर परतण्याचा प्रयत्न करत असलेल्या रहाणेला लागला.

यानंतर आसामच्या सर्व खेळाडूंनी क्षेत्ररक्षणात अडथळा आणल्याबद्दल आऊटचे आवाहन केले आणि मैदानी पंचांनीही हे आवाहन मान्य केले. या निर्णयानंतर लगेचच पंचांनी चहाचा ब्रेकही जाहीर केला. मुंबई संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेला त्याच्या 16 वर्षांच्या कारकिर्दीत प्रथमच क्षेत्ररक्षणात अडथळा आणल्याबद्दल आऊट देण्यात आले. मात्र काही वेळाने आसाम संघाने अपील मागे घेतले आणि रहाणे पुन्हा फलंदाजीला आला.

नियमांनुसार, पुढचा चेंडू टाकण्यापूर्वी बाद करण्याचे अपील मागे घ्यावे लागते आणि जेव्हा अंपायर तो स्वीकारतो तेव्हाच फलंदाज फलंदाजीला परत येऊ शकतो. अजिंक्य रहाणे बाद झाल्यानंतर चहापानाचा ब्रेक घेण्यात आला आणि दरम्यान आसाम संघाने आपला निर्णय बदलला.

मात्र रहाणेला याचा फायदा घेता आला नाही आणि तो केवळ 22 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. रहाणेचा आतापर्यंतचा रणजी हंगाम खराब राहिला असून त्याने आठ डावांत 16.00 च्या सरासरीने केवळ 112 धावा केल्या आहेत. मुंबई संघाने आतापर्यंत 6 गडी गमावून 217 धावा केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST Reform: GSTतील बदलामुळे सरकारला बसणार 40,000 कोटींचा फटका; नवे दर दिवाळी नाही तर 'या' दिवशी लागू होणार

Pune Ganesh Festival : गणेशोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात; पुण्यातील मंडळांचे आकर्षक देखावे सज्ज

आदिनाथ कोठारेचा नवा अवतार! पहिल्यांदाच मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणार, प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल

RBI: रिझर्व्ह बँकेचा खातेदारांना दिलासा!

Mumbai BJP President : अमित साटम मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष! प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची मोठी घोषणा...

SCROLL FOR NEXT