Ajinkya Rahane Sakal
Cricket

Irani Cup 2024: अजिंक्य रहाणेकडे कर्णधारपदाची जबाबदारी; शार्दुल ठाकूर, श्रेयस अय्यरलाही मिळणार संघात संधी

Ajinkya Rahane Set to Lead Mumbai Team in Irani Cup: अजिंक्य रहाणे पुन्हा एकदा मुंबईच्या संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. तसेच शार्दुल ठाकूरही शस्त्रक्रियेनंतर पुनरागमनास सज्ज आहे.

Pranali Kodre

Ajinkya Rahane News: रणजी ट्रॉफी २०२३-२४ स्पर्धेचे विजेते मुंबई संघ आणि शेष भारत संघ यांच्यात यंदा इराणी कप स्पर्धेचा सामना होणार आहे. हा सामना १ ते ५ ऑक्टोबर दरम्यान खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी अजिंक्य रहाणे मुंबई संघाचे नेतृत्व करण्यास सज्ज आहे.

दरम्यान, अद्याप मुंबईने त्यांचा इराणी कप स्पर्धेसाठी संघ जाहीर केलेला नाही. परंतु, क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार रहाणे या स्पर्धेत मुंबईचे नेतृत्व करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. रहाणेच्या नेतृत्वाखालीच मुंबईने रणजी ट्रॉफी २०२३-२४ स्पर्धा जिंकली होती.

रहाणे नुकताच इंग्लंडमधून वनडे कप आणि काऊंटी क्रिकेट या देशांतर्गत स्पर्धा खेळून भारतात परतला आहे.

याशिवाय इराणी कप स्पर्धेत खेळण्यासाठी मुंबईसाठी शार्दुल ठाकूर आणि श्रेयस अय्यर हे देखील उपलब्ध असणार आहेत.

शार्दुलच्या घोट्यावर जून महिन्यात शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळे तो गेल्या काही महिने क्रिकेटपासून दूर होता. पण त्याने नुकतेच केएससीए स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यामुळे तो आता तंदुरुस्त असल्याचे समजत आहे.

तसेच मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्याने क्रिकबझला दिलेल्या माहितीनुसार शार्दुलनेच प्रथम श्रेणी सामन्यासाठी तो उपलब्ध असल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, श्रेयस अय्यरही सध्या भारताच्या कसोटी संघातून बाहेर आहे. त्यामुळे तो देखील ही स्पर्धा खेळण्यासाठी उपलब्ध असेल. त्याला आता भारतीय संघात पुनरागमनासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.

नुकत्याच पार पडलेल्या दुलीप ट्रॉफी स्पर्धेत श्रेयसचा फॉर्म फारसा दिसून आला नव्हता. त्यामुळे आता त्याच्यावरही चांगल्या कामगिरीसाठी दबाव असणार आहे.

इराणी कप स्पर्धेसाठी मुंबई संघाची मंगळवारी निवड जाहीर होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akhilesh Yadav VIDEO : "दिवे अन् मेणबत्त्यांवर पैसा का खर्च करायचा?, ‘ख्रिसमस’ मधून शिका" ; अयोध्या दीपोत्सवाच्या पूर्वसंध्येस अखिलेश यादव यांचं वादग्रस्त विधान!

Bus Accident :भीषण अपघात! चालकाचे नियंत्रण सुटले अन् बस खडकावर आदळली, १५ जणांचा मृत्यू

Air India flight malfunction : 'एअर इंडिया'च्या विमानात बिघाड; सणासाठी निघालेले २५५ भारतीय अडकले परदेशात!

AUS vs IND: ऑस्ट्रेलियाचा प्लॅन झाला! भारताचा सामना करण्यासाठी पहिल्या वनडेसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन नव्या खेळाडूंना संधी

Boat Capsizes: दुर्दैवी! १४ भारतीय नागरिकांना घेऊन जाणारी बोट उलटली, ३ जणांचा मृत्यू, तर...; घटनेनं हळहळ

SCROLL FOR NEXT