Yashasvi Jaiswal Anil Kumble 
Cricket

Yashasvi Jaiswal : जा अन् रोहित शर्माला सांग... अनिल कुंबळेने यशस्वीला दिला कोणता मोलाचा सल्ला?

Yashasvi Jaiswal Anil Kumble : यशस्वी जैस्वालकडून अनिल कुंबळेला आहेत वेगळ्याच अपेक्षा

अनिरुद्ध संकपाळ

Yashasvi Jaiswal Anil Kumble Leg Spin : यशस्वी जैस्वालने तिसऱ्या कसोटीत दुसऱ्या डावात 214 धावांची द्विशतकी खेळी केली. या खेळीच्या जोरावर भारताने इंग्लंडसमोर 557 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा दुसरा डाव 122 धावात संपुष्टात आला. भारताने तब्बल 434 धावांनी सामना जिंकला.

सामना जिंकल्यानंतर भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळेने द्विशतकवीर यशस्वी जैस्वालचे कौतुक केले. याचबरोबर एक मोलाचा सल्ला देखील यशस्वी जैस्वालला दिला.

जिओ सिनेमावर बोलताना अनिल कुंबळे म्हणला की, 'तू फलंदाजीत दमदार कामगिरी केली आहेसच. मात्र माझ्या नजरेत एक गोष्ट आली आहे. मला वाटते की ती गोष्ट तू पुढेही करत रहावीस. तुझ्याकडे लेग स्पिन टाकण्याचे उपजत कसब आहे.'

अनिल कुंबळे पुढे म्हणाले की, 'होय तुझ्याकडे लेग स्पिनरला हवी तशी अॅक्शन आहे. त्यामुळे मागे हटू नकोस कारण तुझी गोलंदाजी कधी उपयोगात येईल हे सांगता येत नाही. सध्या तुला पाठदुखीचा त्रास होत आहे. मात्र ज्यावेळी तू लेग स्पिनवर काम करशील त्यावेळी कर्णधार रोहित शर्माकडे तुला काही षटके गोलंदाजी करायला देण्या सांग.'

यावर यशस्वी जैस्वालने उत्तर दिले की, 'मी कायम गोलंदाजी करण्यासाठी इच्छुक असतो. रोहित भाईने मला तयार राहण्यास सांगितले आहे. मी त्याला मी तयार आहे असं सांगितलय.'

भारताने राजकोटी कसोटी सामना जिंकून मालिकेत 2 - 1 अशी आघाडी घेतली आहे. आता मालिकेतील चौथा सामना हा रांची येथे होणार आहे. हा सामना शुक्रवारी 23 तारखेला सुरू होणार आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commerce Graduates Protest : शासकीय भरती प्रक्रियेत कॉमर्स पदवीधरांवर अन्याय, विद्यार्थ्यांचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

टोलचे १०० रुपये वाचवायला शॉर्टकट घेतला, पण इंजिनिअरनं गमावला जीव; १५ दिवसांपूर्वी घेतलेली नवी कार

Latest Marathi News Live Update : पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक मतदान पेट्या ने-आण करण्यासाठी पीएमपीएम एलच्या १ हजार ५६ बसेस धावणार

बिग बॉस सीजन 3 विजेत्या विशाल निकमने शेअर केले खऱ्या सौंदर्यासोबत फोटो ! 'या' अभिनेत्रीला करतोय डेट

Solapur Crime: बीड जिल्ह्यातील डॉक्टरास गर्भलिंगनिदान प्रकरणी अटक; बार्शीतील प्रकरण, तीनही संशयितांना पोलिस कोठडी!

SCROLL FOR NEXT