क्रिकेट संघात तिसऱ्यांदा कोल्हापूरची अनुजा पाटील कर्णधार  sakal
Cricket

शाब्बास ! क्रिकेट संघात तिसऱ्यांदा कोल्हापूरची अनुजा पाटील कर्णधार

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनची महिला खेळाडू अनुजा पाटीलची (Anuja Patil)महाराष्ट्र वरिष्ठ महिला संघाच्या कर्णधारपदी सलग तिसऱ्या वर्षी निवड झाली, तर शिवाली शिंदे (Shiwali Shinde) व आदिती गायकवाड (Aadidti Gaikwad)यांची महाराष्ट्र महिला वरिष्ठ क्रिकेट संघात निवड झाली. ही स्पर्धा रविवारी (ता.३१) ते ६ नोव्हेबर दरम्यान डेहराडून येथे होणार आहे. स्पर्धेत महाराष्ट्राचा एलिट अ गटात समावेश असून यामध्ये महाराष्ट्रासह त्रिपुरा, झारखंड, आसाम, दिल्ली व केरळ हे संघ सहभागी आहेत.

भारतीय महिला टी २० चँलेंजर करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली होती.

अनुजा पाटीलची यापूर्वी भारतीय टी २०, एशिया कप व चॅलेंजर ट्राँफी स्पर्धेसाठी भारतीय संघात, तसेच महाराष्ट्र १९ वर्षांखालील संघात सलग ४ वर्षे व त्या मधील २ वर्षे कर्णधार, महाराष्ट्र खुला गट महिला संघात सलग ६ वर्षे व त्यामध्ये २ वर्षे कर्णधारपदी निवड झाली होती. शिवाली शिंदेची बेंगलोर येथील १९ वर्षांखालील नॅशनल क्रिकेट अॅकॅडमीमध्ये, सलग ४ वर्षे १९ वर्षांखालील महाराष्ट्र महिला संघातून खेळली आहे. ताईत १ वर्षे संघाची कर्णधार होती. यासोबतच आँल इंडिया इंटर झोनल, खुल्या पश्चिम विभागीय (भारतीय) महिला क्रिकेट संघात उपकर्णधारपदी, पश्चिम विभागीय २३ वर्षांखालील संघात निवड. तसेच सलग चार वर्षे खुला गट महाराष्ट्र व पश्चिम विभाग महिला संघातून खेळत आहे.

भारतीय महिला टी २० चँलेंजर करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली होती. आदिती गायकवाड ही महाराष्ट्र १९ वर्षांखालील संघात सलग पाच वर्षे खेळली आहे. तसेच बीसीसीआयच्या पश्चिम विभागीय १९ वर्षांखालील संघातदेखील निवड झाली होती. बीसीसीआयमार्फत घेणेत येणाऱ्या २३ वर्षांखालील महिला टी २० स्पर्धेसाठी निवड झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

H-1B व्हिसावर ट्रंप प्रशासनाचा मोठा निर्णय; अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीयांना बसणार मोठा फटका?

India vs Brazil Football: भारताविरुद्धच्या सामन्यासाठी ब्राझीलचा संघ जाहीर; व्हिनिशियस, राफीन्हा यांचीही ऐतिहासिक लढतीसाठी निवड

Maratha Reservation: ‘मुंबईला जाणारच’; १२ सप्टेंबरच्या बैठकीत कूचची तारीख ठरणार, मनोज जरांगेंचा निर्धार; भाऊबिजेला अमृता फडणवीसांच्या घरी जाणार

MPSC Exam: एमपीएससी परीक्षार्थींसाठी मोठी अपडेट; गट-क पूर्व परीक्षा पुढे ढकलली, आता ३ जानेवारीला होणार परीक्षा

Nagpur Weather: विदर्भाला उकाड्यापासून मिळणार दिलासा; शुक्रवारनंतर जोरदार पाऊस, तीन जिल्ह्यांना यलो अलर्ट

SCROLL FOR NEXT