Afg vs Ire Cricket Match sakal
Cricket

Afg vs Ire Cricket Match : आयर्लंड संघाचा पहिला कसोटी विजय

आयर्लंडच्या क्रिकेट संघाने शुक्रवारी आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पहिलाच विजय नोंदवला. त्यांनी अफगाणिस्तानवर सहा विकेट राखून मात करत एकमेव कसोटी आपल्या नावावर केली.

सकाळ वृत्तसेवा

ओव्हल : आयर्लंडच्या क्रिकेट संघाने शुक्रवारी आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पहिलाच विजय नोंदवला. त्यांनी अफगाणिस्तानवर सहा विकेट राखून मात करत एकमेव कसोटी आपल्या नावावर केली. मार्क अडेर याने कसोटीतील दोन्ही डावांत मिळून आठ फलंदाज बाद करीत सामनावीराचा मान संपादन केला.

अफगाणिस्तानचा पहिला डाव १५५ धावांमध्ये गुंडाळल्यानंतर आयर्लंडने पहिल्या डावात २६३ धावा फटकावल्या. यामध्ये पॉल स्टर्लिंगने ५२ धावांची खेळी केली. झिया उर रहमान याने ६४ धावा देत पाच फलंदाज बाद केले.

अफगाणिस्तानला दुसऱ्या डावातही ठसा उमटवता आला नाही. हाशमतुल्लाह शाहिदीने ५६ धावांची खेळी केल्यामुळे अफगाणिस्तानला २१८ धावांपर्यंत मजल मारता आली. अफगाणिस्तानकडून आयर्लंडसमोर विजयासाठी १११ धावांचे आव्हान ठेवण्यात आले. आयर्लंडने चार विकेट गमावत हे लक्ष्य ओलांडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT