T20 World Cup 2024 Australia Squad News Marathi sakal
Cricket

Australia Squad T20 WC 24 : ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा! ODI वर्ल्डकप जिंकवणाऱ्या पॅट कमिन्सऐवजी 'या' खेळाडूकडे कर्णधारपदाची माळ

T20 World Cup 2024 Australia Squad : 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपसाठी संघांची घोषणा हळूहळू होत आहे. काल टीम इंडिया आणि इंग्लंडने आपापले संघ जाहीर केले होते, तर आज ऑस्ट्रेलियाने या स्पर्धेसाठी आपला 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे.

Kiran Mahanavar

Australia Announce T20 World Cup 2024 Squad : 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपसाठी संघांची घोषणा हळूहळू होत आहे. काल टीम इंडिया आणि इंग्लंडने आपापले संघ जाहीर केले होते, तर आज ऑस्ट्रेलियाने या स्पर्धेसाठी आपला 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे.

या वर्षी जून महिन्यात वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. आयसीसी टूर्नामेंटमध्ये ऑस्ट्रेलियन संघाची अलीकडची कामगिरी आश्चर्यकारक आहे. जिथे ऑस्ट्रेलियन संघाने 2023 मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि एकदिवसीय वर्ल्ड कप जिंकला आहे. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली संघाने ही दोन्ही विजेतेपदे जिंकली आहेत, मात्र टी-20 वर्ल्ड कपसाठी संघाचे कर्णधारपद पॅट कमिन्सच्या हातात नसून मिचेल मार्शच्या हाती आहे.

टी-20 वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ - (T20 World Cup 2024 Australia Squad) - मिचेल मार्श (कर्णधार), ॲश्टन अगर, पॅट कमिन्स, टीम डेव्हिड, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, ॲडम झम्पा.

ॲश्टन अगर आणि कॅमेरून ग्रीन यांची टी-20 वर्ल्ड कपसाठी निवड झाली आहे. जेव्हा हे दोन्ही खेळाडू गेल्या 18 महिन्यांपासून ऑस्ट्रेलियाच्या टी-20 संघाबाहेर होते. दरम्यान, गेल्या काही मालिकेसाठी मार्शला संघाचा हंगामी कर्णधार करण्यात आला होता, मात्र बुधवारी संघाची घोषणा करताना मार्शची वर्ल्ड कपसाठी संघाचा कर्णधार म्हणून निवड करण्यात आली.

कर्णधार बनल्यावर मार्श म्हणाला की, माझ्या देशासाठी खेळणे हा माझ्यासाठी मोठा बहुमान आहे आणि आता वर्ल्ड कपमध्ये संघाचे नेतृत्व करणे हा त्याहून मोठा सन्मान आहे.

ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू स्टीव्ह स्मिथची टी-20 वर्ल्ड कपसाठी संघात निवड झालेली नाही. स्मिथ बऱ्याच दिवसांपासून टी-20 फॉरमॅटमध्ये फारसा फॉर्ममध्ये नाही. अशा स्थितीत त्याला संधी न मिळणे हा आश्चर्यकारक निर्णय नाही.

ऑस्ट्रेलियाचे वर्ल्ड कपचे वेळापत्रक

  • 6 जून : ऑस्ट्रेलिया विरुद्ध ओमान

  • 9 जून : ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड

  • 12 जून : ऑस्ट्रेलिया विरुद्ध नामिबिया

  • 16 जून : ऑस्ट्रेलिया विरुद्ध स्कॉटलंड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray Full Speech : मराठी, मुंबई, महाराष्ट्र अन् बाळासाहेब ठाकरेंचा किस्सा : राज ठाकरेंचं 25 मिनिटांचं प्रचंड आक्रमक भाषण

Raj Thackeray : ''ठाकरेंची मुलं इंग्रजी मिडियम शिकतात'' म्हणणाऱ्या फडणवीसांना राज ठाकरेंनी सुनावलं; म्हणाले, ''मी हिब्रूत शिकेन पण...''

Latest Maharashtra News Updates : लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद, आता नव्याने नोंदणी होणार नाही - ठाकरे

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

SCROLL FOR NEXT