Aus vs Nz sakal
Cricket

Aus vs Nz : ऑस्ट्रेलियाचे टी-२० मालिकेत निर्भेळ यश

ऑस्ट्रेलियाच्या संघाने न्यूझीलंडमध्ये टी-२० मालिकेत निर्भेळ यश संपादन केले. ऑस्ट्रेलियाने पावसाचा व्यत्यय आलेल्या अखेरच्या टी-२० लढतीत न्यूझीलंडवर डकवर्थ लुईस नियमानुसार २७ धावांनी मात करीत तीन सामन्यांची मालिका ३-० अशी खिशात घातली.

सकाळ वृत्तसेवा

ऑकलंड : ऑस्ट्रेलियाच्या संघाने न्यूझीलंडमध्ये टी-२० मालिकेत निर्भेळ यश संपादन केले. ऑस्ट्रेलियाने पावसाचा व्यत्यय आलेल्या अखेरच्या टी-२० लढतीत न्यूझीलंडवर डकवर्थ लुईस नियमानुसार २७ धावांनी मात करीत तीन सामन्यांची मालिका ३-० अशी खिशात घातली. या लढतीत पावसाचा व्यत्यय आला.

त्यामुळे न्यूझीलंडसमोर १० षटकांमध्ये १२६ धावांचे आव्हान ठेवण्यात आले. फिन ॲलेन (१३ धावा), विल यंग (१४ धावा) व टीम सेईफर्ट (२ धावा) यांच्याकडून निराशा झाली. ग्लेन फिलिप्स (नाबाद ४० धावा) व मार्क चॅपमन (नाबाद १७ धावा) यांनी विजयासाठी प्रयत्न केले; पण त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले नाही.

त्याआधी ट्रॅव्हिस हेडने ३३ धावांची, मॅथ्यू शॉर्टने २७ धावांची, ग्लेन मॅक्सवेलने २० धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाने १०.४ षटकांत चार बाद ११८ धावा केल्या असताना पाऊस आला. त्यानंतर खेळ होऊ शकला नाही. पाऊस थांबल्यानंतर न्यूझीलंडसमोर १० षटकांत १२६ धावांचे आव्हान ठेवण्यात आले. दरम्यान, मॅथ्यू शॉर्टची सामनावीर म्हणून तर मिचेल मार्शची मालिकावीर म्हणून निवड करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT