Babar Azam Captaincy esakal
Cricket

Babar Azam: पाकिस्तानचा यु-टर्न! बाबर आझम पुन्हा झाला कर्णधार, शाहीन आफ्रिदीची हाकालपट्टी

Pakistan Cricket Team Captain: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बाबर आझमकडे पुन्हा एकदा कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे.

Pranali Kodre

Babar Azam Pakistan Captain: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) मोठा निर्णय घेतला असून त्यांनी स्टार फलंदाज बाबर आझमकडे पुन्हा एकदा वनडे आणि टी20 संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. याबद्दल पीसीबीने रविवारी (31 मार्च) माहिती दिली आहे.

पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नाकवी यांनी रविवारी बाबर आझमची अधिकृतरित्या पाकिस्तानच्या वनडे आणि टी20 संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती केली. याबाबत पीसीबीने ट्विटही केले आहे.

दरम्यान, शाहीन आफ्रिदीला हटवून पीसीबीने पुन्हा बाबरकडे टी20 संघाचे नेतृत्व सोपवले आहे.

खरंतर 2023 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानला उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यात अपयश आल्यानंतर बाबर आझमच्या नेतृत्वावर टीका झाली होती.

त्यानंतर त्याने कसोटी, वनडे आणि टी20 अशा तिन्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रकारातील पाकिस्तान संघाचे कर्णधारपद सोडले होते.

यानंतर शाहीन आफ्रिदीकडे पाकिस्तानच्या टी20 संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले होते. तर शान मसूदकडे कसोटी संघाच्या नेतृत्वाची धूरा सोपवली होती. याशिवाय बाबर आझमने नेतृत्व सोडल्यानंतर पाकिस्तानने वनडेसाठी दुसऱ्या कोणालाही अद्याप नेतृत्वाची धूरा सोपवली नव्हती.

शाहीन आफ्रिदीच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानला टी20 मध्ये फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. त्याच्या नेतृ्त्वाखाली न्यूझीलंडविरुद्ध पाकिस्तानने 1-4 अशा फरकाने मालिकाही गमावली.

तसेच त्याने यापूर्वी लाहोर कलंदर्सला दोनदा पाकिस्तान सुपर लीगचे विजेतेपद मिळवून दिले होते, मात्र 2024 सालच्या हंगामात त्याच्या नेतृत्वाखाली लाहोर संघ गुणतालिकेत सर्वात खाली राहिला होता.

दरम्यान, यानंतर आता आगामी टी20 वर्ल्डकप स्पर्धेचा विचार करता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पुन्हा त्यांच्या जुन्या कर्णधाराकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. 1 जूनपासून टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धा खेळवली जाणार असून आता या स्पर्धेत बाबर आझमच पाकिस्तानचे नेतृत्व करताना दिसेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT