Pakistan Cricket Team BAN vs PAK esakal
Cricket

Pakistan Cricket Team : बाबर, रिझवानसह आफ्रिदीलाही डच्चू; असा असणार पाकिस्तानचा नवा संघ?

Pakistan Cricket Team Babar Azam : टी 20 वर्ल्डकपमधील निराशाजनक कामगिरीनंतर पाकिस्तानच्या स्टार खेळाडूंना डच्चू मिळण्याची शक्यता?

अनिरुद्ध संकपाळ

Pakistan Cricket Team BAN vs PAK : पाकिस्तानचा संघ टी 20 वर्ल्डकप 2024 च्या ग्रुप स्टेजमधूनच बाहेर पडला. त्यानंतर पाकिस्तान संघावर चाहते प्रचंड नाराज झाले आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड देखील संघात मोठे बदल करण्यासाठी सज्ज झाला आहे. आगामी बांगलादेशविरूद्धच्या कसोटी मालिकेत पीसीबी अनेक दिग्गजांना संघाबाहेर ठेवण्याची शक्यता आहे.

बाबर आझम, शाहीन आफ्रिदी आणि मोहम्मद रिझवान हे मायदेशात होणाऱ्या बांगलादेशविरूद्धच्या कसोटी मालिकेत दिसण्याची शक्यता कमी आहे. जिओ सुपरने दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तान संघाचा कसोटी कर्णधार शान मसूद आणि मुख्य प्रशिक्षक जेसन गिलेस्पी यांच्यासोबतच निवडसमितीने बांगलादेशविरूद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी संघ काय असावा याची चर्चा सुरू केली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रिझवान, बाबर आझम आणि शाहीन आफ्रिदी यांना विश्रांती देण्यात येण्याची शक्यता आहे.

सर्फराज अहमद परतणार?

मोहम्मद रिझवानला विश्रांती दिल्यामुळं पाकिस्तानचा माजी कर्णधार सर्फराज अहमद हा संघात परतण्याची शक्यता आहे. सर्फराज अहमदने डिसेंबरमध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला होता. नसीम शाह हा गेल्या कसोटी सामन्यात दुखापतग्रस्त झाला होता. तो देखील संघात परतण्याची शक्यता आहे. तो शाहीनच्या अनुपस्थितीत पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजीच नेतृत्व करेल.

याचबरोबर खुर्रम शहझाद याला पदार्पण करण्याची संधी दिली जाऊ शकतो. तसेच सौद शकील, अब्दुल्ला शफिक, सलमान अली आगा, शहानवाझ दहानी, मिर हामझा आणि आमिर जमाल यांना देखील संघात संधी मिळू शकते.

(Cricket News In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Census: जनगणनेसाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला पुण्यात शिवीगाळ, मुलाला मारहाण; ⁠कर्मचारी संघटनेचा इशारा

NEET Paper Leak: नीट पेपर फुटीच्या प्रकरणात पंतप्रधानांनी घातलं लक्ष; 'पीएमओ'तील अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, आता हवाई दलाची घेणार मदत...

Ratnagiri Weather : रत्नागिरीत पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर, दिवसभर ढगाळ वातावरण

Property Tax : मिळकतकर वसुलीने गाठला १००० कोटीचा टप्पा

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT