Pakistan Cricket | T20 World Cup eSakal
Cricket

Pakistan Cricket: चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी तब्बल 5 संघ करणार पाकिस्तान दौरा, पाहा पुढच्या सात महिन्यांचं शेड्युल

Pakistan Cricket Schedule: येत्या सात महिन्यांमध्ये पाच संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार असून त्याचं वेळापत्रक समोर आलं आहे.

Pranali Kodre

Pakistan Cricket Schedule: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने शुक्रवारी (५ जुलै) पुरुष संघाचे आगामी वेळापत्रक घोषित केले होते. पाकिस्तानच्या आगामी वेळापत्रकानुसार येत्या ६ ते ७ महिन्यांत पाच संघ मालिकांसाठी पाकिस्तान दौरा करणार आहेत.

यामध्ये बांगलादेश, इंग्लंड, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका हे पाच संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहेत.

बांगलादेश, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज हे तीन संघ कसोटी मालिका खेळण्यासाठी पाकिस्तानला जाणार आहेत, तर न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका पाकिस्तानविरुद्ध तिरंगी वनडे मालिका खेळणार आहे.

याशिवाय पाकिस्तानही आगामी काळात ऑस्ट्रेलिया, झिम्बाब्वे आणि दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहे. ते या दौऱ्यांमध्ये मिळून ९ वनडे, ९ टी२० आणि २ कसोटी सामने खेळणार आहे.

पाकिस्तानचा मायदेशातील हंगाम ऑगस्टमध्ये सुरू होणार आहे. बांगलादेश ऑगस्ट-सप्टेंबरदरम्यान २ कसोटी मालिका खेळण्यासाठी पाकिस्तानला जाईल. तसेच इंग्लंड ऑक्टोबर महिन्यात तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी पाकिस्तानला जाणार आहे. यानंतर पुढील वर्षाच्या सुरुवातीलाच जानेवारीमध्ये वेस्ट इंडिज पाकिस्तानमध्ये २ सामन्यांची कसोटी मालिका खेळेल.

त्याचबरोबर चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ पूर्वी फेब्रुवारी महिन्यात न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका हे संघ तिरंगी वनडे मालिका खेळतील. या मालिकेनंतर चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ पाकिस्तानमध्ये खेळवली जाणार आहे. दरम्यान, या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ पाकिस्तानला जाणार की नाही, याबाबत अद्याप बीसीसीआयने स्पष्ट केलेलं नाही.

पाकिस्तानचे परदेशी दौरे

तसचे नोव्हेंबर २०२४ मध्ये पाकिस्तान तीन वनडे आणि तीन टी२० सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. त्याचबरोबर नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान पाकिस्तान झिम्बाब्वे दौऱ्यातही तीन वनडे आणि तीन टी२० सामने खेळणार आहे.

यानंतर डिसेंबर २०२४ ते जानेवारी २०२५ दरम्यान पाकिस्तानला दक्षिण आफ्रिकेचा मोठा दौरा करायचा आहे. या दौऱ्यात तीन टी२०, ३ वनडे आणि २ कसोटी सामने खेळवले जाणार आहेत.

पाकिस्तानचे आगामी काळातील वेळापत्रक

मायदेशातील सामने -

बांगलादेशचा पाकिस्तान दौरा २०२४ (कसोटी मालिका)

  • २१ ते २५ ऑगस्ट - पहिला कसोटी सामना, रावळपिंडी

  • ३० ऑगस्ट ते ३ सप्टेंबर - दुसरा कसोटी सामना, कराची

इंग्लंडचा पाकिस्तान दौरा २०२४ (कसोटी मालिका)

  • ७ ते ११ ऑक्टोबर - पहिला कसोटी सामना, मुलतान

  • १५ ते १९ ऑक्टोबर - दुसरा कसोटी सामना, कराची

  • २४ ते २८ ऑक्टोबर - तिसरा कसोटी सामना, रावळपिंडी

वेस्ट इंडिजचा पाकिस्तान दौरा २०२५ (कसोटी मालिका)

  • १६ ते २० जानेवारी - पहिला कसोटी सामना, कराची

  • २४ ते २८ जानेवारी - दुसरा कसोटी सामना, मुलतान

न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेचा पाकिस्तान दौरा २०२५ (तिरंगी वनडे मालिका)

  • ८ फेब्रुवारी - पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, मुलतान

  • १० फेब्रुवारी - न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, मुलतान

  • १२ फेब्रुवारी - पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, मुलतान

  • १४ फेब्रुवारी - अंतिम सामना, मुलतान

पाकिस्तानचे परदेशी दौरे

पाकिस्तानचा ऑस्ट्रेलिया दौरा २०२४ (वनडे आणि टी२० मालिका)

  • ४ नोव्हेंबर - पहिला वनडे सामना, मेलबर्न

  • ८ नोव्हेंबर - दुसरा वनडे सामना, ऍडलेड

  • १० नोव्हेंबर - तिसरा वनडे सामना, पर्थ

  • १४ नोव्हेंबर - पहिला टी२० सामना, ब्रिस्बेन

  • १६ नोव्हेंबर - दुसरा टी२० सामना, सिडनी

  • १८ नोव्हेंबर - तिसरा टी२० सामना, होबार्ट

पाकिस्तान झिम्बाब्वे दौरा २०२४ (वनडे आणि टी२० मालिका)

  • २४ नोव्हेंबर - पहिला वनडे सामना, बुलवायो

  • २६ नोव्हेंबर - दुसरा वनडे सामना, बुलवायो

  • २८ नोव्हेंबर - तिसरा वनडे सामने, बुलवायो

  • १ डिसेंबर - पहिला टी२० सामना, बुलवायो

  • ३ डिसेंबर - दुसरा टी२० सामना, बुलवायो

  • ५ डिसेंबर - तिसरा टी२० सामना, बुलवायो

पाकिस्तानचा दक्षिण आफ्रिका दौरा २०२४-२५ (वनडे, टी२० आणि कसोटी मालिका)

  • १० डिसेंबर - पहिला टी२० सामना, डर्बन

  • १३ डिसेंबर - दुसरा टी२० सामना, सेंच्युरियन

  • १४ डिसेंबर - तिसरा टी२० सामना, जोहान्सबर्ग

  • १७ डिसेंबर - पहिला वनडे सामना, पार्ल

  • १९ डिसेंबर- दुसरा वनडे सामना, केपटाऊन

  • २२ डिसेंबर - तिसरा वनडे सामना, जोहान्सबर्ग

  • २६ - ३० डिसेंबर - पहिला कसोटी सामना, सेंच्युरियन

  • ३ - ७ जानेवारी - दुसरा कसोटी सामना, केपटाऊन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT