IND vs PAK T20 WC 2024  esakal
Cricket

IND vs PAK T20 WC 2024 : भारत-पाकिस्तान सामन्यात पडणार धावांचा पाऊस; खेळपट्टीबाबत क्युरेटरचं मोठं वक्तव्य

धावांचा पाऊस: India-Pakistan match; Curator's big statement about the pitch...

अनिरुद्ध संकपाळ

IND vs PAK T20 WC 2024 : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना म्हटल्यावर संपूर्ण क्रिकेट जगताचं लक्ष लागून राहतं. आगामी 1 जूनपासून सुरू होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपमध्ये भारत अन् पाकिस्तान 9 जूनला एकमेकांशी भिडणार आहेत. हा सामना ड्रॉप इन पिचवर खेळवला जाणार आहे. त्यामुळे ही खेळपट्टी कशी असेल याबाबत सर्वांमध्ये उत्सुकता आहे.

युएसएमधील वर्ल्डकपच्या सामन्यांचे पिच तयार करण्यासाठी आयसीसीने अॅडेलिडे ओव्हलचे मुख्य क्युरेटर डॅमिन ह्युज यांना पाचारण केलं आहे. त्यांनी हे पिच फलंदाजीला पोषक असेल असं भाकित केलं आहे. त्यामुळे भारत - पाकिस्तान सामन्यात धावांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

ह्युज म्हणाले की, 'पिचवर चेंडू हा चांगल्या वेगाने येईल आणि उसळी घेईल. बॉल बॅटवर चांगल्या प्रकारे येईल. खेळाडूंना अशीच खेळपट्टी हवी असते. सर्वसाधारण जशी खेळपट्टी असते तशीच ही खेळपट्टी असेल. संपूर्ण स्पर्धा संपेपर्यंत ही खेळपट्टी टिकाव धारावी अशा प्रकारेच ती तयार केलेली आहे. खेळाडू या खेळपट्टीवर खेळताना एन्जॉय करतील.'

रोहित सेनेसाठी होम कंडिशन?

आयसीसी इव्हेंट हेड ख्रिस यांनी सांगितले की खेळपट्टीचे डायमेशन हे वानखेडे स्टेडियमवर असलेल्या खेळपट्टीसारखेच असणार आहे.

ख्रिस म्हणाले की, 'नवी स्टेडियमचे साईज काय असेल याबाबत चर्चा होत आहे. भारत पाकिस्तान सामन्याचे ग्राऊंडची साईज ही पूर्वेला 75 मीटर आणि 67 मीटर उत्तरेला अशी असणार आहे. ही साईज वानखेडे स्टेडियमएवढेच आहे. जागतिक दर्जाची ड्रेनेज सिस्टम असणार आहे.

(Cricket News In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Top gaining stocks list: शेअर बाजार कोसळला तरी 'या' 5 शेअर्सनी दिले बंपर रिटर्न! फक्त पाच दिवसांमध्ये 47 टक्क्यांपर्यंत धावले

'लॉक अप' सोडताच सुनीता आहुजांचा मोठा खुलासा; म्हणाल्या, 'रिअ‍ॅलिटी' शब्दाचाच तिटकारा आलाय'

Premature Grey Hair Causes: कमी वयात केस पांढरे होतायत? फक्त ताण नाही, 'हे' ५ आजारही असू शकतात कारण

Uttarakhand: ट्रिप करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! भीमताल ते नैनीताल प्रवास होणार मिनिटांत? रोपवे प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांचा ग्रीन सिग्नल

Strait of Hormuz: 'होर्मुझ सामुद्रधुनी'वरून इराणमध्येच पडले दोन गट; लष्कर आणि सरकारमध्ये बिनसलं, जगावर पुन्हा इंधन संकटाचं सावट

SCROLL FOR NEXT