Gautam Gambhir | KKR Sakal
Cricket

Gautam Gambhir Coach: शिक्कामोर्तब झाले! गौतम गंभीर बनला टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक, BCCI ची घोषणा

Team India Coach: गौतम गंभीरला भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त करण्यात आल्याची घोषणा बीसीसीआयने केली आहे.

Pranali Kodre

Team India Coach: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मोठी घोषणा केली आहे. बीसीसीआयने भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी गौतम गंभीरची अधिकृतरित्या नियुक्ती केली आहे. याबाबत बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे.

जय शाह यांनी ट्वीट केले आहे की 'मी गंभीरचे भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून मनापासून स्वागत करतो. मॉर्डन-डे क्रिकेट सातत्याने बदल आहेत, हे बदल गंभीरने जवळून पाहिले आहेत. त्याच्या संपूर्ण कारकि‍र्दीत त्याने विविध भूमिका निभावल्या आहेत आणि उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे मला विश्वास आहे की गौतम गंभीर भारतीय क्रिकेटला पुढे नेण्यासाठी आदर्श व्यक्ती आहे.'

'भारतीय संघासाठी त्याचे स्पष्ट विचार, अफाट अनुभव त्याला ही रोमांचक आणि सर्वाधिक मागणी असलेली प्रशिक्षकासाठी भूमिका पार पाडण्यासाठी सर्वाधिक पात्र ठरवते. बीसीसीआयकडून त्याला नव्या प्रवासासाठी पूर्ण पाठिंबा आहे.'

खरंतर राहुल द्रविडचा टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेनंतर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ संपला आहे. तसेच तो ही जबाबदारी पुढे कायम करण्यास तयार नव्हता. त्यामुळे भारतीय संघाला नवा प्रशिक्षक टी२० वर्ल्ड कपनंतर मिळणार हे निश्चित होते.

या पदासाठी अनेक नावं चर्चेत होती. पण त्यातही गंभीरचे नाव आघाडीवर होते. गंभीरने या पदासाठी बीसीसीआयच्या सल्लागार समीतीला मुलाखतही दिली होती. त्यानंतर अखेर गंभीरच्या नावावर या पदासाठी शिक्कामोर्तब झाले आहे.

आता गंभीर जुलैच्या अखेरीस सुरू होणाऱ्या भारताच्या श्रीलंका दौऱ्यापासून भारतीय संघाशी जोडला जाईल. त्याचा प्रमुख प्रशिक्षक म्हणून डिसेंबर २०२७ पर्यंत कार्यकाळ असणार आहे.

त्यामुळे आता आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५, कसोटी चॅम्पियनशीप, टी२० वर्ल्ड कप २०२६, वनडे वर्ल्ड कप २०२७ अशा महत्त्वाच्या स्पर्धा भारतीय संघ त्याच्या मार्गदर्शनाखाली खेळताना दिसेल.

गंभीरचे भारतीय क्रिकेटसाठी मोठे योगदान राहिले आहे. २००७ साली टी२० वर्ल्ड कप आणि २०११ वनडे वर्ल्ड कप एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकला होता, तेव्हा गंभीरने त्या विजयांमध्ये मोलाचा वाटा उचलला होता.

दोन्ही स्पर्धांच्या अंतिम सामन्यात गंभीर भारताकडून सर्वोच्च खेळी करणारा खेळाडू होता. गंभीरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजारांहून अधिक धावा केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT