BCCI considers hike in Test match fees | Latest Marathi News sakal
Cricket

भारतीय क्रिकेटमध्ये होणार बदल; 'रेड बॉल' क्रिकेटबाबत BCCI लवकरच घेणार मोठा निर्णय

भारतीय संघाने रांची कसोटीत इंग्लंडला पराभूत करून मालिकेवर कब्जा केला दरम्यान...

Kiran Mahanavar

भारतीय संघाने रांची कसोटीत इंग्लंडला पराभूत करून मालिकेवर कब्जा केला. दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) रेड बॉल क्रिकेटबाबत मोठा निर्णय घेऊ शकते. खरं तर, आयपीएल खेळण्यासाठी अनेक खेळाडू रेड बॉल क्रिकेट खेळत नाही. त्यामुळे खेळाडूंना कसोटी क्रिकेटची तयारी करता येत नाही आणि खेळाडू रेड बॉलच्या क्रिकेटऐवजी आयपीएलवर अधिक लक्ष केंद्रित करतात.

रेड बॉल क्रिकेटमध्ये खेळाडूंना आयपीएलमध्ये जेवढे पैसे मिळतात तेवढे मिळत नाहीत. अशा परिस्थितीत आता बीसीसीआय रेड बॉल क्रिकेटमधील खेळाडूंच्या फी वाढवण्याबाबत मोठा निर्णय घेऊ शकते. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, आयपीएलमध्ये खेळण्यासाठी खेळाडू रेड बॉल क्रिकेट खेळत नाही, अशी परिस्थिती टाळण्यासाठी बीसीसीआय कसोटीसाठी मॅच फी वाढवण्याचा विचार करत आहे.

इशान किशनने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर कसोटी मालिकेतून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला होता. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी इशान किशनला रणजी ट्रॉफीमध्ये खेळण्याचा सल्ला दिला होता पण इशानने रणजीमध्ये एकही सामना खेळला नाही.

अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असाही दावा करण्यात आला होता की, इशान किशन रेड बॉल क्रिकेटपेक्षा आयपीएलवर जास्त लक्ष केंद्रित करतो. यानंतर पाठदुखीमुळे इंग्लंड मालिकेतून बाहेर पडलेल्या श्रेयस अय्यरला एनसीएकडून सांगण्यात आले की, अय्यर तंदुरुस्त आहे आणि खेळण्यासाठी तयार आहे, मात्र त्यानंतरही अय्यरने रणजी सामना खेळला नाही.

बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, उदाहरणार्थ जर एखाद्याने कॅलेंडर वर्षात सर्व कसोटी मालिका खेळल्या तर त्याला वार्षिक रिटेनर कॉन्ट्रॅक्ट व्यतिरिक्त बक्षीस दिले पाहिजे. हे सुनिश्चित करण्यासाठी आहे की खेळाडू अधिकाधिक रेड-बॉल क्रिकेटसाठी येतील. कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी हा एक अतिरिक्त फायदा होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'राजा शिवाजी' सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, पाचव्या दिवशी कमावले 'इतके' कोटी

Satej Patil Amal Mahadik Meet : अमल महाडिक मला वारंवार भेटतात पण, मुश्रीफ भेटत नाहीत; सतेज पाटलांनी गोकुळ, केडीसीसीतील इनसाईड स्टोरीच सांगितली

West Bengal election: भाजपने संधी दिली अन् भांडी घासणारी महिला झाली आमदार; कलिता मांझींचा थक्क करणारा प्रवास!

WhatsApp गुपचुप हटवत आहे सगळ्यांचे आवडते फीचर! तुम्हाला कळणारही नाही अन् बदलून जाईल तुमचे ॲप

ऋतुराजचा विक्रम धोक्यात? Sanju Samson ने एकाच हंगामात दोनदा केला 'हा' पराक्रम; दिल्लीच्या गोलंदाजांचा उडवला थरकाप

SCROLL FOR NEXT