Ind vs Eng 4th Test Marathi News sakal
Cricket

Ind vs Eng 4th Test : भारत-इंग्लंड कसोटी मालिकेदरम्यान वाईट बातमी, BCCI ने ट्वीट करत दिली माहिती

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना रांची येथे खेळला जात आहे.

Kiran Mahanavar

India vs England 4th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना रांची येथे खेळला जात आहे. झारखंड स्टेट क्रिकेट असोसिएशन आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. या सामन्याचा 2 दिवसाचा खेळ खेळल्या गेला आहे. पण सामन्याच्या दुसऱ्या दिवशी एक वाईट बातमी समोर आली, ज्याबद्दल बीसीसीआयने सोशल मीडियावर एक पोस्ट दिली.

रांची कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी बीसीसीआय प्रॉडक्शन टीम काळ्या पट्ट्या घालून दिसली आणि आता त्यामागचे कारण समोर आले आहे. स्पोर्ट्स कॅमेरामन कमलनादिमुथु तिरुवल्लुवन यांचे निधन झाले आहे. ते बराच काळ भारतीय क्रिकेट प्रसारणचा एक भाग होते. शुक्रवारी त्यांचे निधन झाले. महिला प्रीमियर लीगच्या उद्घाटन समारंभात देखील ते उपस्थित होते. यावेळी त्यांनी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना कव्हर केला.

कॅमेरामन कमलनादिमुथु तिरुवल्लुवन यांना लोक प्रेमाने थिरू म्हणतात. बीसीसीआयने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून त्याच्या मृत्यूची बातमी दिली. या व्हिडिओमध्ये बीसीसीआयची प्रॉडक्शन टीम काळ्या पट्ट्या बांधताना दिसत आहे. या व्हिडिओसोबत बीसीसीआयने लिहिले की बीसीसीआयच्या प्रॉडक्शन टीमने 23 फेब्रुवारी रोजी निधन झालेल्या थिरूच्या स्मरणार्थ काळ्या पट्ट्या बांधल्या आहेत. आम्ही त्यांच्या जवळच्या आणि प्रियजनांप्रती शोक व्यक्त करतो आणि बीसीसीआय त्यांच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त करतो.

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, इंग्लंडच्या पहिल्या डावात केलेल्या 353 धावांना प्रत्युत्तर देताना भारताने चौथ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी खेळ संपेपर्यंत सात गडी गमावून 219 धावा केल्या आहेत. यष्टिरक्षक ध्रुव जुरेल 30 धावा आणि कुलदीप यादव 17 धावा करत खेळत आहे. भारत सध्या इंग्लंडपेक्षा 134 धावांनी मागे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT