Ben Stokes esakal
Cricket

Ben Stokes IND vs ENG : इंग्लंडच्या कर्णधाराने तब्बल आठ महिन्याने पहिला चेंडू टाकला अन् हाती लागलं सोनं; Video व्हायरल

Ben Stokes Rohit Sharma Wicket Video : स्टोक्सने मालिकेत यापूर्वी कधीही गोलंदाजी केली नाही मात्र ज्यावेळी तो गोलंदाजीला आला त्यानं कर्णधाराला साजेशी कामगिरी केली.

अनिरुद्ध संकपाळ

Ben Stokes Bowled after ashes 2023 Took Rohit Sharma Wicket India Vs England : भारताचा स्टार फलंदाज आणि कर्णधार रोहित शर्माने दुसऱ्या दिवशी खणखणीत शतकी खेळी करत कॅप्टन्स इनिंग खेळली. त्याने शुभमन गिलसोबत दुसऱ्या विकेटसाठी 171 धावांची भागीदारी रचत संघाला मजबूत स्थितीत पोहचवले.

दुसऱ्याच दिवशीच्या पहिल्या सत्रात सामना इंग्लंडच्या हातून निसटताना पाहून बेन स्टोक्सने एक मोठा डाव खेळला. त्याने गोलंदाजीत बदल करत स्वतः कर्णधार रोहितला गोलंदाजी करण्याचे ठरवले. विशेष म्हणजे स्टोक्स हा अॅशेस 2023 नंतर तब्बल आठ महिन्यांनी गोलंदाजी करत होता.

अन् एवढ्या दीर्घ कालावधीनंतर देखील गोलंदाजी करूनही बेन स्टोक्सला सोन्यासारखी विकेट पहिल्याच चेंडूवर मिळाली. त्याने कर्णधार रोहितचा 103 धावांवर त्रिफळा उडवला. रोहित बाद झाल्यानंतर मार्क वूडने देखील आपल्या कर्णधाराचा कित्ता गिरवला. त्याने शुबमन गिलला 110 धावांवर बाद करत भारताला अजून एक धक्का दिला.

मात्र या धक्क्यातून पदार्पण करणारा देवदत्त पडिक्कल आणि सर्फराज खानने भारताला सावरले. त्यांनी चौथ्या विकेटसाठी जवळपास शतकी भागीदारी रचत संघाला 375 धावांच्या पुढे पोहचवले. भारताकडे आता 158 धावांची आघाडी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT