MS Dhoni-Manoj Tiwari  
Cricket

MS Dhoni: धोनी खासदार मनोज तिवारी यांना का म्हणतो 'जीजाजी'? व्हायरल Video मध्ये खुलासा

MS Dhoni-Manoj Tiwari Relation: सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून त्यात खासदार मनोज तिवारी यांनी खुलासा केला आहे की त्यांना धोनी जीजाजी का म्हणतो?

Pranali Kodre

MS Dhoni-Manoj Tiwari Relation: भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी लोकप्रिय खेळाडू आहे. दरम्यान, धोनी लोकप्रिय खेळाडू असला, तरी तो त्याचा वैयक्तिक आयुष्य खाजगी ठेवण्याकडे कल असतो, त्यामुळे त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्याबद्दल चाहत्यांना उत्सुकता असते.

असे असतानाच आता एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात खासदार मनोज तिवारी यांनी खुलासा केला आहे की त्यांना धोनी जीजा (दाजी) का म्हणतो. या व्हिडिओमध्ये की मनोज तिवारी यांना विचारले की धोनी त्यांना जीजा म्हणतो का?

त्यावर त्यांनी सांगितले की 'मी त्याचा सख्खा मेहुणा नाही, पण त्या गोष्टीत थोडे सत्य आहे. माझा जो मेहुणा होता अरुण पांडे त्याचा धोनी चांगला मित्र आहे. त्यामुळे अरुण मला जीजा म्हणत असल्याने दिल्लीत आम्ही एकत्र वैगरे होतो आणि अरुण मित्र असल्याने धोनीही मला जीजा म्हणायचा.'

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की अरुण पांडेची बहिण प्रतिमा पांडे यांनी मनोज तिवारी यांच्याशी १९९९ मध्ये लग्न केले होते. लग्नानंतर त्यांनी नाव बदलून राणी तिवारी केले. त्यानंतर राणी आणि मनोज यांना एक मुलगीही झाली.

पण मिडिया रिपोर्ट्सनुसार बीग बॉस या रिऍलिटी शो मध्ये मनोज तिवारी सहभागी झाल्यानंतर त्यांच्याबद्दल श्वेता तिवारीबरोबरील अफेअरच्या चर्चा झाल्या होत्या. त्या कारणाने नाराज होत राणी तिवारी यांनी मनोज तिवारी यांच्याशी घटस्फोट घेतला. 2012 साली त्यांचा घटस्फोट झाला.

यानंतर 2020 मध्ये मनोज तिवारी यांनी सुरभी तिवारीशी लग्न केले. सुरभी आणि त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT