England vs Pakistan Sakal
Cricket

Pakistan Blast: पाकिस्तानात सुरक्षेचे तीन तेरा! PAK vs ENG कसोटी मालिकेपूर्वी वाढलं टेन्शन

Blast in Karachi airport: इंग्लंड क्रिकेट संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे. अशातच रविवारी रात्री कराचीमध्ये स्फोट झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Pranali Kodre

England Tour of Pakistan: इंग्लंड क्रिकेट संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात त्यांना सोमवारपासून (७ ऑक्टोबर) तीन सामन्यांची कसोटी मालिका पाकिस्तानविरुद्ध खेळायची आहे. पहिला सामना मुलतानला खेळवला जाणार आहे.

मात्र, असं असतानाच सुरक्षेबद्दल प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. कारण पुन्हा एकदा पाकिस्तानमध्ये स्फोट झाल्याचे समोर आले आहे. रविवारी रात्री उशीरा कराची आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ एक मोठा स्फोट झाला असून यात जीवतहानीही झाली आहे.

या स्फोटामध्ये दोन चीनी नागरिकांसह तीन जणांचा मृत्यू झाल्याचे समजत आहे. त्याचबरोबर १७ जणं जखमी झाल्याचेही समोर आले आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार बलूच लिबरेशन आर्मीने या स्फोटाची जबाबदारी घेतली आहे. या स्फोटाची तपासणीही सुरू झाली आहे.

दरम्यान, आता इंग्लंड संघ आधीच पाकिस्तान दौऱ्यावर आहे, ते सध्या जरी कराचीपासून दूर मुलतानमध्ये असले तरी देशात अशाप्रकारच्या स्फोटाने परदेशी संघांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

यापूर्वीही २००९ साली श्रीलंकन संघावर पाकिस्तानमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर जवळपास दशकभर पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट झाले नव्हते. मात्र, गेल्या काही वर्षात अनेक संघांनी पाकिस्तान दौरा केला असून त्यांना मोठ्या प्रमाणात सुरक्षाही पुरवण्यात आली होती.

मात्र, अशाप्रकारच्या स्फोटानंतर पुन्हा एकदा सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यातच पुढच्या वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचे आयोजन करण्याच्या तयारीत पाकिस्तान आहे. अशात जर देशात असे स्फोट झाले, तर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनावरही प्रश्न उपस्थित होतील.

इंग्लंडचा पाकिस्तान दौरा

इंग्लंड संघाला पाकिस्तानमध्ये ७ ऑक्टोबरपासून मुलतानला पहिला कसोटी सामना खेळायचा आहे. त्यानंतर मुलतानलाच १५ ऑक्टोबरपासून दुसरा कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. त्याचबरोबर शेवटचा सामना २४ ऑक्टोबर रोजी रावळपिंडी येथे सुरू होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१२ कोटींची रोकड, ६ कोटींचे दागिने अन्...; काँग्रेस आमदाराकडे आढळलं घबाड, जप्त केलेल्या मुद्देमालाचा आकडा वाचून व्हाल थक्क

"माझ्या मुलाला वाचवा मी..." मुलाच्या जन्मावेळेस ढसाढसा रडू लागला गोविंदा; "गर्भलिंग निदान चाचणी.."

AC कोचच्या बाथरुममध्ये आढळला पाच वर्षांच्या मुलीचा मृतदेह....मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमध्ये खळबळ

Success story: गुन्हेगारीमुळे बदनाम होतं गाव! आता प्रत्येक घरामध्ये आहेत अधिकारी; नेमका बदल कसा झाला?

Latest Marathi News Updates : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्वच्छ सन्मान सोहळ्याला, उप मुख्यमंत्री अजित पवार उपस्थित

SCROLL FOR NEXT