Rishi Sunak | James Anderson Sakal
Cricket

Rishi Sunak Cricket: जेव्हा ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक करतात दिग्गज अँडरसनच्या वेगवान बॉलिंगचा सामना; पाहा Video

Rishi Sunak Playing Cricket: ब्रिटनचे PM सुनक यांचे क्रिकेटप्रेम पुन्हा दिसले, दिग्गज अँडरसनच्या वेगवान गोलंदाजीचा केला सामना, पाहा व्हिडिओ

Pranali Kodre

Rishi Sunak Playing Cricket: ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे क्रिकेटचे प्रशंसक आहेत, ही गोष्ट लपून राहिलेली नाही. सुनक हे अनेकदा क्रिकेट खेळताना दिसले आहेत. त्यांनी वर्ल्डकप विजेत्या इंग्लंडच्या खेळाडूंबरोबर क्रिकेटही खेळले होते.

आता पुन्हा एकदा ते इंग्लंडच्या खेळाडूंबरोबर क्रिकेट खेळताना दिसले असून यावेळी तर त्यांनी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनचा सामनाही केला.

सुनक यांनी एक्सवर (ट्वीटर) व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ते आधी जेम्स अँडरसनशी बोलताना दिसत आहे. नुकतेच 700 कसोटी विकेट्स घेतलेल्या अँडरसनला त्यांनी सांगितले की माझ्याविरुद्ध जरा सौम्य गोलंदाजी कर, ज्यावर अँडरसन म्हणाला, 'बघू'.

दरम्यान, अँडरसनविरुद्ध खेळताना सुनक यांनी चांगला बचाव केला. त्यांचे तिथे अकादमीत असलेल्या युवा खेळाडूंनही कौतुक केले. सुनक हे इंग्लंड संघ नेटमध्ये सराव करत असताना त्यांच्यात सामील झाले होते.

सुनक हे व्हिडिओमध्ये असंही म्हणाले, 'मी इथेच दिवसभर थांबणार आहे. ऑफिसमध्ये सांगा की मी नंतर येईल.'

दरम्यान, व्हिडिओला त्यांनी कॅप्शन दिले आहे की 'इंग्लंड क्रिकेट माझी निवड होऊ शकते का?'

त्यावर इंग्लंड क्रिकेटनेही उत्तर दिले आहे की 'वाईट नव्हते पण अजून नेटमध्ये थोड्या सरावाची गरज आहे.'

दरम्यान, सुनक यांनी काही दिवसांपूर्वीच घोषणा केली आहे की 2026 आणि 2030 मध्ये होणाऱ्या T20 विश्वचषक सामन्यांचे आयोजन करणाच्या दृष्टीने आणि 900,000 हून अधिक लहान मुलांना क्रिकेट खेळण्यास मदत करण्यासाठी तळागाळातील क्रिकेटमध्ये 35 पाऊंड मिलियनची गुंतवणूक करणार आहे.

इंग्लंड 2026 साली महिला टी20 वर्ल्डकप आयोजित करणार आहे, तर 2030 मध्ये इंग्लंड स्कॉटलंड आणि आयर्लंड यांच्यासह संयुक्तरित्या पुरुष टी20 वर्ल्डकपचे आयोजन करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कार आणि सिमेंट मिक्सर ट्रकची भीषण धडक; ११ जणांचा जागीच मृत्यू; कल्याण अहिल्यानगर हायवेवर दुर्घटना

"इंडस्ट्रीतून हाकलून द्यावं इतका मी बेशिस्त वागलो" आस्ताद काळेने उघड केली कठीण काळाची आठवण; म्हणाला..

Latest Marathi News Live Update: दिल्ली विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी

Strait of Hormuz: शेवटच्या क्षणी काय घडलं? पाकिस्तानमधील बैठक का फिस्कटली? इराणने सांगून टाकलं

पुण्यात PhD करणाऱ्या तरुणीनं संपवलं आयुष्य, प्राध्यापकाने २ दिवसांपूर्वी स्टॅम्पवर लिहून दिलेलं चूक झाली; चिठ्ठीत लिहिलं कारण

SCROLL FOR NEXT