Jasprit Bumrah sakal
Cricket

Jasprit Bumrah : चौथ्या कसोटीत बुमराला विश्रांती? ; रांचीतील या सामन्यात केएल राहुल खेळण्याची शक्यता

रांचीमध्ये होणाऱ्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यातून वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा याला विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. त्याचवेळी केएल राहुल तंदुरुस्त होऊन संघात परतण्याची शक्यता आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : रांचीमध्ये होणाऱ्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यातून वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा याला विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. त्याचवेळी केएल राहुल तंदुरुस्त होऊन संघात परतण्याची शक्यता आहे. भारताने २-१ आघाडी घेतलेल्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील हा चौथा सामना रांचीत येत्या शुक्रवारपासून सुरू होत आहे. आत्तापर्यंतच्या तीन सामन्यांत मिळून १७ विकेट मिळवणारा बुमरा सर्वाधिक बळी मिळवणारा गोलंदाज आहे.

राजकोटमधील सामना आज सोमवारी संपणार होता; परंतु भारताने रविवारी चौथ्याच दिवशी सर्वात मोठ्या विजयाची मोहीम फत्ते केली. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार भारतीय संघ उद्या रांचीला रवाना होणार आहे. त्या संघासोबत बुमरा असणार नाही, अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली. मात्र राहुल थेट रांचीत दाखल होईल, असेही या सूत्रांनी सांगितले.

बुमराला विश्रांती देण्याचा हा निर्णय आश्चर्यचकित करणारा नसेल. मालिकेतील तिन्ही सामने चौथ्याच दिवशी संपलेले असले तरी बुमराने भारतीय गोलंदाजीचा भार अधिक प्रमाणात वाहिला आहे. त्याने एकूण ८०.५ षटके गोलंदाजी केली आहे. मालिकेच्या हिताला प्राधान्य देताना खेळाडूंवरील सामन्यांचा ताण याचेही संघ व्यवस्थापनाकडून नियोजन केले जाते. याच सूत्रानुसार मोहम्मद सिराजला दुसऱ्या कसोटीतून विश्रांती देण्यात आली होती.

राजकोट येथील सामन्यात दणदणीत विजय मिळवून भारताने इंग्लंडवर वर्चस्व मिळवलेले असले तरी बुमराची अनुपस्थिती परडवणारी नाही. केवळ नव्या चेंडूवरच नव्हे तर जुन्या चेंडूवर बुमरा रिव्हर्स स्विंग प्रभावीपणे टाकतो. बुमराला राजकोट येथील सामन्यात विश्रांती दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती; परंतु दुसरा सामना चौथ्या दिवशी संपला आणि दोन सामन्यांत अगोदर आठ दिवसांची विश्रांती होती. त्यामुळे बुमराला पुरेशी विश्रांती मिळाल्यामुळे राजकोट येथील सामन्यात त्याला खेळवण्यात आले.

हैदराबाद येथे झालेला पहिला सामना भारताने गमावला असला तरी राहुलने प्रभावी कामगिरी केली होती. मात्र त्याच वेळी त्याच्या मांडीचा स्नायू दुखावला होता. विराट कोहलीच्या अनुपस्थितीमुळे भारताची मधळी फळी अननुभवी झाली होती. मात्र तिसऱ्या कसोटीत सर्फराझ खान आणि यष्टिरक्षक फलंदाज ध्रुव जुरेल यांनी शानदार फलंदाजी करून विश्वास दाखवला. मात्र रजत पाटीदारने निराशा केली आहे. राहुल संघात परतल्यास पाटीदारला जागा रिकामी करावी लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Accident : संतोष आणि मोहम्मद जिवलग मित्र पण नियतीच्या मनात वेगळ होतं..., दुचाकींच्या धडकेत दोघे मित्र ठार

Bachchu Kadu : 'शेतकरी एकत्र येत नाही, हाच सर्वांत मोठा शोक'; बच्चू कडूंचा सरकारवर घणाघात

Latest Marathi News Live Update: नुकसानग्रस्तांना मदत करण्याची सरकारची भूमिका - अमित शाह

Kolhapur Police : पोलिस अधिकाऱ्याच्या गळ्यातील ताईत डिपार्टमेंट बदनाम करतोय, मोका प्रस्ताव रद्द करण्यासाठी ६५ लाखांची केली मागणी अन्...

Nirav Modi: प्रत्यार्पण खटला पुन्हा सुरू करा; नीरव मोदीस मानसिक आणि शारीरिक छळाची भीती

SCROLL FOR NEXT