Cameron Bancroft ruled out of Sheffield Shield final after bike accident news sakal
Cricket

Cameron Bancroft News : सँडपेपर प्रकरणात अडकलेल्या ऑस्ट्रेलियन स्टार खेळाडूचा मोठा अपघात! झाली गंभीर दुखापत

Cameron Bancroft Accident News : सँडपेपर प्रकरणात अडकलेल्या ऑस्ट्रेलियाचा स्टाक फलंदाज कॅमेरून बॅनक्रॉफ्ट बाईक अपघाताचा बळी ठरला आहे.

Kiran Mahanavar

Cameron Bancroft Accident News : सँडपेपर प्रकरणात अडकलेल्या ऑस्ट्रेलियाचा स्टाक फलंदाज कॅमेरून बॅनक्रॉफ्ट बाईक अपघाताचा बळी ठरला आहे. या अपघातात कॅमेरून बॅनक्रॉफ्ट गंभीर जखमी झाला आहे.

त्याचवेळी, या अपघातानंतर तो शेफिल्ड शील्डच्या अंतिम फेरीत खेळू शकणार नाही. शेफिल्ड शिल्डचा अंतिम सामना वेस्टर्न ऑस्ट्रेलिया आणि तस्मानिया यांच्यात खेळला जाईल, परंतु अपघातानंतर कॅमेरून बॅनक्रॉफ्ट हा वेस्टर्न ऑस्ट्रेलियन संघाचा भाग असणार नाही.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कॅमेरून बॅनक्रॉफ्टच्या अनुपस्थितीत वेस्टर्न ऑस्ट्रेलिया शेफिल्ड शील्ड फायनलमध्ये टास्मानियाविरुद्ध ॲरॉन हार्डीसह मैदानात उतरू शकते.

कॅमेरून बॅनक्रॉफ्टच्या कारकिर्दीवर नजर टाकली तर, त्याने आतापर्यंत 10 कसोटी सामने आणि 1 टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने कसोटी सामन्यात 26.24 च्या सरासरीने 446 धावा केल्या आहेत.

आतापर्यंत, कॅमेरून बॅनक्रॉफ्ट ऑस्ट्रेलियासाठी कसोटी सामन्यांमध्ये शतक झळकावण्यात अपयशी ठरला आहे, परंतु त्याने तीनदा पन्नास धावांचा टप्पा ओलांडला आहे. मात्र, शेफिल्ड शील्ड फायनलपूर्वी कॅमेरून बॅनक्रॉफ्टची दुखापत हा वेस्टर्न ऑस्ट्रेलियासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

त्याचबरोबर कॅमेरून बॅनक्रॉफ्टने या मोसमात शेफिल्ड शिल्डमध्ये चांगली कामगिरी केली आहे. या मोसमात कॅमेरून बॅनक्रॉफ्टने 778 धावा केल्या आहेत. या हंगामात त्याच्या टीम वेस्टर्न ऑस्ट्रेलियासाठी तो सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू आहे.

शेफील्ड शील्ड फायनलमध्ये तस्मानियाविरुद्ध वेस्टर्न ऑस्ट्रेलियामध्ये अनेक मोठ्या खेळाडूची नावे नाहीत. मिचेल मार्श, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस स्टॉइनिस, ॲश्टन टर्नर आणि झ्ये रिचर्डसन हे खेळाडू आयपीएलमुळे खेळू शकणार नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: अजित पवारांनी विजय वडेट्टीवारांची घेतील सांत्वनपर भेट

तारापूर एमआयडीसीत वायू गळती; चार कामगारांचा मृत्यू; दोघांची प्रकृती चिंताजनक

SCROLL FOR NEXT