Rohit Sharma Sakal
Cricket

'सो गये क्या सब?', कर्णधार Rohit Sharma फिल्डर्सवर भडकला, चेन्नई कसोटीतील Video Viral

Rohit Sharma Viral Video: भारत आणि बांगलादेश संघात चेपॉक स्टेडियमवर सुरु असलेल्या कसोटीत रोहित शर्मा एका क्षणी चिडलेला दिसला होता. त्याचा व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे.

Pranali Kodre

India vs Bangladesh 1st test: भारताचा कर्णधार रोहित शर्मा मैदानात असताना नेहमीच काही ना काही बोलताना दिसतो. बऱ्याचदा तो खेळाडूंना त्याच्या मुंबईच्या स्टाईलने मार्गदर्शन करताना, कधी ओरडताना, कधी क्षेत्ररक्षण लावताना दिसतो.

यादरम्यान, त्याची काही वाक्य स्टंपमाईकमध्ये कैदही होतात. त्याने एकदा भारताच्या युवा खेळाडूंना 'गार्डन मै घुमने वाले बंदे' असंही म्हटलं होतं. त्याचाही व्हिडिओ व्हायर झाला होता. आता असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो व्हिडिओ भारत आणि बांगलादेश संघात चेन्नईमध्ये सुरू असलेल्या कसोटी सामन्यादरम्यानचा आहे.

भारत आणि बांगलादेश संघात चेपॉक स्टेडियमवर १९ सप्टेंबरपासून कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरू झाला आहे.

या सामन्यादरम्यानचा जो व्हिडिओ व्हायरल होत आहे, त्याच दिसते की भारतीय संघ क्षेत्ररक्षण करत असताना रोहित शर्मा चिडला आहे. तो क्षेत्ररक्षण लावत असताना चिडून भारताच्या काही क्षेत्ररक्षकांना म्हणत आहे की 'सर्वजण झोपलेत काय?' दरम्यान, रोहित नक्की कोणावर चिडला आहे, हे स्पष्ट झालेलं नाही.

दरम्यान, रोहितला या सामन्यात दोन्ही डावात मोठी खेळी करता आली नाही. तो दोन्ही डावात स्लीपमध्ये झेल देत बाद झाला. पहिल्या डावात त्याने ६ धावा केल्या होत्या, तर दुसऱ्या डावात त्याने ५ धावा केल्या. पण असं असलं तरी भारताने या सामन्यात वर्चस्व ठेवण्यात यश मिळवलं आहे.

पहिल्या डावात आर अश्विन (११३) आणि रविंद्र जडेजा (८६) यांच्या १९९ धावांच्या भागीदारीमुळे भारताने ३७६ धावा केल्या. यशस्वी जैस्वालनेही ५६ धावांची खेळी केली. या डावात बांगलादेशकडून हसन मेहमुदने ५ विकेट्स घेतल्या. त्यानंतर बांगलादेशला पहिल्या डावात सर्वबाद १४९ धावाच करता आल्या, त्यामुळे भारताने २२७ धावांची आघाडी घेतली.

या डावात भारताकडून जसप्रीत बुमराहने ४ विकेट्स घेतल्या. भारताने दुसरा डाव ४ बाद २८७ धावांवर घोषित करत बांगलादेशसमोर ५१५ धावांचे लक्ष्य ठेवले. भारताकडून दुसऱ्या डावात शुभमन गिल (११९*) आणि ऋषभ पंत (१०९) यांनी शतके ठोकली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur : शेतकऱ्यानं म्हशी घ्यायला ७ लाख साठवले, सहावीत शिकणाऱ्या लेकानं गेमवर ५ लाख उडवले; बँक स्टेटमेंट बघून बसला धक्का

India Vs England : दुसऱ्या कसोटीतील लाजीरवाण्या पराभवानंतर इंग्लंडचा मोठा निर्णय, 'या' वेगवान गोलंदाजाचा केला संघात समावेश

Weekly Astrology 7 to 13 July 2025: या आठवड्यात कोणत्या राशींना होणार आर्थिक लाभ अन् नोकरी व्यवसायत मिळेल उत्तम संधी, वाचा साप्ताहिक राशिभविष्य

Latest Maharashtra News Updates : मुंबईत वाहतूक ठप्प! मोनो रेल सेवा बंद, मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाडाने प्रवाशांचे हाल

Global Club Championship: पाकिस्तानला डावलण्याची शक्यता; जागतिक क्लब अजिंक्यपद स्पर्धा : पाच संघांचा सहभाग

SCROLL FOR NEXT