Mohammad Shami Sakal
Cricket

Mohammad Shami टीम इंडियात पुनरागमन कधी करणार? अजित आगरकरने दिले महत्त्वाचे अपडेट्स

Ajit Agarkar on Mohammad Shami's Comeback: मोहम्मद शमी २०२३ वर्ल्ड कपनंतर क्रिकेट खेळलेला नाही, त्यामुळे आता त्याचे भारतीय संघात कधी पुनरागमन होऊ शकते. याबाबत निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरने अपडेट्स दिले आहेत.

Pranali Kodre

Ajit Agarkar on Mohammad Shami's Return: भारतीय क्रिकेट संघ सोमवारी (२२ जुलै) श्रीलंका दौऱ्यासाठी रवाना झाला आहे. या दौऱ्यापूर्वी भारतीय संघाचा नवनिर्वाचित मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केले. यादरम्यान, वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या पुनरागमनाबाबतही आगरकरने महत्त्वाची माहिती दिली.

आगरकरने दिलेल्या माहितीनुसार शमी सप्टेंबरमध्ये भारतीय संघात पुनरागमन करू शकतो. शमी 2023 वर्ल्ड कपनंतर क्रिकेट खेळलेला नाही. त्याने या वर्ल्ड कपमध्ये शानदार कामगिरी करताना सर्वाधिक २४ विकेट्स घेतल्या होत्या.

पण २०२३ वर्ल्ड कपपासून तो टाचेच्या दुखापतीचा सामना करत होता. अखेर त्याला फेब्रुवारी 2024 मध्ये शस्त्रक्रिया करावी लागली. त्यामुळे त्याला आयपीएल २०२४ आणि टी२० वर्ल्ड कप स्पर्धाही खेळता आली नाही.

आता यानंतर त्याचे पुनरागमन कधी होऊ शकते, याबाबतच्या प्रश्नावर आगरकर म्हणाला,'आम्हाला साधारण दुखापत असलेल्या खेळाडूंबाबत माहित आहे, आशा हे की ते लवकर पुनरागमन करतील.

'शमीने गोलंदाजीची सुरूवात केली आहे, जी चांगली गोष्ट आहे. बांगलादेशविरुद्ध १९ सप्टेंबरपासून कसोटी सुरू होणार आहे, त्यात त्याला संधी देण्याचे लक्ष्य आहे. पण तोपर्यंत तो पूर्ण तंदुरुस्त असेल की नाही, हे माहित नाही. आम्ही याबद्दल एनसीएमधील लोकांना विचारून ठरवू.'

शमीने शस्त्रक्रियेनंतर नुकतीच आता गोलंदाजीची सुरुवात केली असून आता तो तंदुरुस्ती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.

याशिवाय आगामी काळात अनेक कसोटी सामने खेळायचे असल्याने आणखी वेगवान गोलंदाजीचे पर्यायही शोधण्याचा प्रयत्न असणार आहे, असंही आगकरने सांगितले.

आगरकर म्हणाला, 'आगामी काळात खूप कसोटी सामने आहेत, त्यामुळे वेगवान गोलंदाजांचीही आम्हाला सखोलता हवी आहे. बुमराह, शमी आणि सिराज मागील काही काळापासून संघात आहेत आणि ते यापुढेही असतील. पण याबाबतही चर्चा झाली आहे की आता प्रथम श्रेणी क्रिकेटही बरेच खेळले जाईल, त्यातूनही काही पर्याय मिळू शकतात.'

दरम्यान, भारतीय संघाला श्रीलंका दौऱ्यानंतर सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान बांगलादेशविरुद्ध मायदेशात दोन कसोटी आणि तीन टी२० सामने खेळायचे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

SRH vs RR Live: इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले! पण, जिंकली Orange Cap; झेल घेताना दोन खेळाडू एकमेकांना आपटले

Gadchiroli Health: कोरची तालुक्यात गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू; आशा वर्करची टाळाटाळी, रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता अन्..

Latest Marathi News Live Update: कर्नाटक कॉंग्रेसचे आमदार खर्गेंच्या भेटीला

Pune Crime: गुन्हे शाखेकडून वाघोलीतील हातभट्टी जेसीबीने उद्ध्वस्त; दोन लाखाचा मुद्देमाल नष्ट, गुन्हे शाखेचा छापा!

SCROLL FOR NEXT