India Cricket Team Sakal
Cricket

ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात Asian Gamesचे गोल्ड जिंकले, पण ते भारताला पुढे पुन्हा जिंकता नाही येणार, कारण...

Cricket may be omitted from Asian Games 2026: जपानमध्ये २०२६ आशियाई क्रीडा स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. मात्र या स्पर्धेतून क्रिकेटला वगळले जाण्याची शक्यता आहे.

Pranali Kodre

Cricket in Asian Games 2026: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आणि सर्व राष्ट्रीय क्रिकेट बोर्डांच्या प्रयत्नांनंतर आता २०२८ ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट खेळले जाणार आहे. पण अशातच एक धक्कादायक गोष्ट समोर येत आहे, ते म्हणजे क्रिकेटचा समावेश कदाचीत २०२६ आशियाई क्रीडा स्पर्धेत मात्र केला जाणार नाही.

२०२६ मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेचे आयोजन जपान करणार आहे. यापूर्वी २०२३ साली झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेट खेळवण्यात आले होते.

यानंतर २०२६ मध्येही या खेळासाठी आशियाई ऑलिम्पिक परिषद आणि जपान आयोजन समितीने पाठिंबा दर्शवला होता, पण असं असतानाही आता क्रिकेटच्या समावेशावर प्रश्नचिन्ह उभे राहिल्याने सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

आशियाई ऑलिम्पिक परिषदचे उपमहासंचालक विनोद कुमार तिवारी यांनी म्हटले होते की आयोजन समिती क्रिकेटला २०२६ आशियाई क्रीडा स्पर्धेत सामील करण्यास उत्साही आहेत.

मात्र क्रिकट्रॅकरने दिलेल्या वृत्तानुसार सुत्रांकडून असे समजत आहे की नागोया येथील एका बेसबॉल स्टेडियमलला पुन्हा तयार करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय. पण असं असलं तरी वाहतुकीच्या समस्या (logistical challenges) सोडवणं कठीण आहे, हेच आशियाई क्रीडा स्पर्धेतून क्रिकेटला संभवत: वगळले जाण्यासाठी मुख्य कारण ठरू शकते.

मात्र, जपान क्रिकेट असोसिएशनचे अधिकारी ऍलन कर यांनी क्रिकेटचा समावेशाची गरज असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता अंतिम निर्णय काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष असेल.

क्रिकेट यापूर्वी २०१०, २०१४ आणि २०२३ या साली झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये खेळवण्यात आले होते. २०२३ मध्ये भारताच्या महिला संघाने हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात आणि पुरुष संघाने ऋतुराज गायकवाडच्या सुवर्णपदक जिंकले होते.

तसेच २०१० आणि २०१४ साली झालेल्या सामन्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांचा दर्जा देण्यात आला नव्हता. मात्र आयसीसीकडून २०२३ साली झालेल्या स्पर्धांना आंतरराष्ट्रीय सामन्यांचा दर्जा देण्यात आला होता.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की २०१० आणि २०१४ साली झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघ खेळले नव्हते. त्यांनी २०२३ साली पहिल्यांदाच या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT