Rohit Sharma Birthday Sakal
Cricket

Rohit Sharma Birthday: युवराजचा स्पेशल व्हिडिओ, तर BCCI चीही खास पोस्ट; हिटमॅनवर क्रिकेटविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव

Rohit Sharma Birthday: रोहित शर्मावर वाढदिवसानिमित्त क्रिकेटविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Pranali Kodre

Rohit Sharma Birthday: मंगळवारी (30 एप्रिल) भारताचा कर्णधार रोहिक शर्माचा ३७ वा वाढदिवस आहे. त्याच्या या वाढदिवसानिमित्त त्याला चाहत्यांबरोबरच क्रिकेटविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्याला भारतीयच नाही, तर अनेक परदेशी खेळाडूंनीही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

भारताचा माजी अष्टपैलू आणि रोहितचा चांगला मित्र असलेल्या युवराज सिंगने त्याला शुभेच्छा देताना एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. याबरोबरच त्याने कॅप्शन दिले आहे की 'भावा वाढदिवसाच्या शुभेच्छा! तुझ्या बॅटमधून जसे मोठे शॉट्स निघतात, तसेच यश आणि आनंद तुला मिळत राहो, खूप प्रेम.'

तसेच बीसीसीआयने त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आकडेवारी सांगत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. बीसीसीआयने लिहिले की ४७२ आंतरराष्ट्रीय सामने १८८२० आंतरराष्ट्रीय धावा आणि ४८ आंतरराष्ट्रीय शतके. वनडेत तीन द्विशतके करणारा एकमेव क्रिकेटपटू. भारताचा कर्णधार रोहित शर्माला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.'

मुंबई इंडियन्सनेही 'हा हिटमॅन दिवस' असं म्हणत रोहितला शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवायदेखील अनेक आयपीएल संघांनी रोहितला शुभेच्छा दिल्या आहेत.

सुरेश रैनाने रोहितला शुभेच्छा देताना लिहिले की 'नेहमी हसतमुख असलेल्या रोहित शर्मा तुझ्या चैतन्यपूर्ण इनिंगप्रमाणेच तुझा हा दिवसही असो. तुझ्या खूप यश मिळो आणि निरोगी आरोग्य लाभो.'

याव्यतिरिक्तही रोहितला अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 59 कसोटीत ४५.४६ च्या सरासरीने ४१३७ धावा कल्या आहेत. ज्यात त्याने १२ शतके आणि १७ अर्धशतके केली आहेत.

त्याने २६२ वनडे सामने खेळताना ४९.१२ च्या सरासरीने ३१ शतके आणि ५५ च्या अर्धशतकांसह १०७०९ धावा केल्या आहेत. त्याने १५१ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले असून ५ शतके आणि २९ अर्धशतकांसह ३९७४ धावा केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air India Fare Hike: इंधन संकटामुळे एअर इंडियाच्या विमान भाड्यात वाढ, आंतरराष्ट्रीय तिकिटांवर अधिक परिणाम

Police Helmet Rule : पोलिस अधिकारी, अंमलदारांना ‘हेल्मेटसक्ती’; पोलिसांना हेल्मेट मोफत देण्याची सोय

Latest Marathi News Live Update : पुण्यात भयंकर प्रकार! वारजेमध्ये वाहतूक पोलिसाच्या अपहरणाचा प्रयत्न

Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गामुळे माण-खटावमधील वन्यजीव अधिवास धोक्यात; मानवी वस्त्यांमध्ये बिबट्या-लांडग्यांचा शिरकाव वाढणार?

दोन तासांचा प्रवास ३० मिनिटात, कॅशलेस तिकिट अन्...; नव्या मेट्रो मार्गांचा मुंबईकरांना फायदा, CM फडणवीस काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT