Aman Khan - Shreyas Iyer  Sakal
Cricket

Mumbai Cricket: स्टार क्रिकेटरने सोडली मुंबईची साथ, 2024-25 हंगामात खेळणार 'या' संघाकडून?

Aman Khan: मुंबईचा स्टार अष्टपैलू क्रिकेटपटू अमन खानने आगामी देशांतर्गत हंगामात मुंबईकडून न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

Pranali Kodre

Mumbai Cricket: भारताच्या देशांतर्गत क्रिकेटच्या २०२४-२५ हंगामाला सप्टेंबरमध्ये सुरुवात होणार आहे. पण त्यामुळे मुंबईचा स्टार अष्टपैलू क्रिकेटपटू अमन खानने मोठा निर्णय घेतला आहे. अमनने आगामी हंगामात मुंबईकडून न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार मुंबईचा टी२० स्पेशालिस्ट म्हणून ओळखला जाणारा २७ वर्षीय अमन आता २०२४-२५ हंगामात पदुच्चेरी संघाकडून खेळणार आहे. याबाबत मुंबई मिररला एका सुत्राने माहिती दिली आहे की अमनने मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून ना हरकत प्रमाणपत्र घेतले आहे. तो या हंगामात पदुच्चेरीकडून खेळताना दिसेल.

याबाबत पदुच्चेरी क्रिकेट असोसिएशनचे माजी सचिव पी दामोदरन यांनी म्हटले की अमन आमच्यासाठी सर्व प्रकारातील खेळाडू असणार आहे. मुंबई क्रिकेटमधील पंरपरा आमच्या क्रिकेटचा विकास करण्यासाठी मदतगार ठरत आहे.

त्यांनी असंही म्हटलं की मुंबईचे खेळाडू चिवट असतात, ते स्थिरावल्यानंतर विकेट जाऊ देत नाही. तसेच फलंदाजी आणि गोलंदाजी देखील गांभीर्याने घेतात.

अमन हा पदुच्चेरीकडून खेळणारा मुंबईचा पहिलाच खेळाडू नाही, यापूर्वी अभिषेक नायर, सागर उदेशी, सागर त्रिवेदी आणि सिदक सिंग हे मुंबईचे खेळाडू पदुच्चेरीकडून क्रिकेट खेळले आहेत.

दरम्यान, आगामी हंगामात अमनव्यतिरिक्त मध्यप्रदेशचे अंकीत शर्मा आणि अरुण कार्तिक हे देखील पदुच्चेरीकडून खेळण्याची शक्यता आहे.

अमनने आत्तापर्यंत लिस्ट ए क्रिकेटमध्ये ६ सामन्यांत ३४ धावा केल्या, तर २ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच टी२०मध्ये त्याने २५ सामन्यांत २६३ धावा आणि ४ विकेट्स घेतल्या आहेत.

तो कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघाकडूनही आयपीएलमध्ये खेळला आहे. त्याने आयपीएलमध्ये १२ सामन्यांमध्ये ११५ धावा केल्या आहेत.

तसेच जर त्याला यंदाच्या हंगामात पदुच्चेरीकडून रणजी क्रिकेटमध्ये संधी मिळाली, तर हे त्याचे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पदार्पणही ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT