David Miller Sakal
Cricket

Video: मैदानातील लाईट्स गेले, २ तास खेळ थांबला अन् मग David Miller च्या वादळानं TKR चा हरवत रॉयल्सला पोहचवलं क्वालिफायर्समध्ये

David Miller 17 ball 50 runs in CPL 2024 Eliminator: कॅरेबियन प्रीमियर लीग २०२४ स्पर्धेतील एलिमिनेटर सामना फ्लडलाईट्समधील बिघाडामुळे तब्बल २ तास थांबला होता. त्यानंतर डेव्हिड मिलरने तुफानी खेळ करत त्याच्या संघाला क्वालिफायर्समध्ये पोहचवलं.

Pranali Kodre

CPL 2024 Eliminator for Barbados Royals vs Trinbago Knight Riders: कॅरेबियन प्रीमियर लीग २०२४ स्पर्धेत मंगळवारी (१ ऑक्टोबर) एलिमिनेट सामना प्रोव्हिडेन्समध्ये त्रिनबॅगो नाईट रायडर्स विरुद्ध बार्बाडोस रॉयल्स संघात पार पडला. या सामन्यात एक अजब घटना घडली.

मैदानातील फ्लडलाईट्समध्ये काहीतरी बिघाड झाल्याने हा सामना तब्बल २ तास थांबवण्यात आला आणि मग डकवर्थ लुईस नियम वापरण्यात आला. त्यानंतर बार्बाडोसने डेव्हिड मिलरच्या वादळी खेळामुळे ९ विकेट्सने विजय मिळवला.

या सामन्यात प्रथम फलंदाजीला उतरलेल्या त्रिनबॅगो १९.१ षटकात ३ बाद १६८ धावांवर खेळत असताना मैदानातील फ्लडलाईट्समध्ये बिघाड झाल्याने सामना थांबला.

त्यावेळी निकोलस पूरन शतकाच्या जवळ होता. त्याने ६० चेंडूत ६ चौकार आणि ५ षटकारांसह ९१ धावांची नाबाद खेळी केली होती. तसेच आंद्रे रसेल २० धावांवर नाबाद होता. त्यावेळी त्रिनबॅगोकडून महिश तिक्षणा, नवीन-उल-हक आणि रेमन सायमंड्स यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली होती.

दरम्यान, फ्लडलाईट्समधील बिघाडाच्या कारणाने तब्बल दोन तासासाठी सामना थांबला होता. त्यानंतर किमान स्थानिक वेळेनुसार १० वाजून ५२ मिनिटांनी ५ षटकांचा सामना होण्याची अपेक्षा होती. मात्र, ११ वाजल्यानंतर सामन्याला पुन्हा सुरुवात झाली. पण सामन्यातील बराच वेळ वाया गेल्यानंतर बार्बाडोससमोर ५ षटकात ६० धावांचे आव्हान ठेवण्यात आले.

या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी बार्बाडोसकडून कर्णधार रोवमन पॉवेल आणि क्विंनटन डी कॉक उतरले. पण डी कॉकला सुनील नरेनने ४ धावांवरच बाद केले.

पण त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या डेव्हिड मिलरने सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा स्विकारला आणि त्याने ३ चौकार आणि ५ षटकारांची बसरात करत १७ चेंडूतच नाबाद ५० धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे बार्बाडोसने चार चेंडू राखूनच विजय मिळवला. त्यामुळे बार्बाडोसने आता क्वालिफायर्स-२ सामन्यात प्रवेश केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan statement: 'ऑपरेशन सिंदूर'च्या पहिल्याच दिवशी झाला होता भारताचा पराभव - पृथ्वीराज चव्हाणांचं विधान!

IPL 2026 All Teams: ग्रीन सर्वात महागडा खेळाडू, तर अनकॅप्ड खेळाडूंही मलामाल; लिलावानंतर पाहा सर्व संघांतील खेळाडूंची यादी

IPL 2026 Auction Live: जाता जाता Prithvi Shawला दिलासा! एका फ्रँचायझीला आली दया... घेतलं एकदाचं संघात, बघा कोणाकडून खेळणार

PL 2026 Auction : पप्पू यादव यांचा मुलगा आयपीएलमध्ये खेळणार; लिलावात मोजली तगडी रक्कम, जाणून घ्या कोणत्या संघाची झाली कृपा

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

SCROLL FOR NEXT