Women IPL 2024 sakal
Cricket

Women IPL 2024 : चौथ्या विजयासह दिल्ली पहिल्या स्थानावर कायम ; गतविजेत्या मुंबईचा दुसरा पराभव

कर्णधार मेग लॅनिंग (५३ धावा) व जेमिमा रॉड्रिग्ज (नाबाद ६९ धावा) यांच्या धडाकेबाज अर्धशतकी खेळींच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्स संघाने मंगळवारी पार पडलेल्या महिला प्रीमियर लीगमधील लढतीत गतविजेत्या मुंबई इंडियन्सवर २९ धावांनी मात केली.

सकाळ वृत्तसेवा

दिल्ली : कर्णधार मेग लॅनिंग (५३ धावा) व जेमिमा रॉड्रिग्ज (नाबाद ६९ धावा) यांच्या धडाकेबाज अर्धशतकी खेळींच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्स संघाने मंगळवारी पार पडलेल्या महिला प्रीमियर लीगमधील लढतीत गतविजेत्या मुंबई इंडियन्सवर २९ धावांनी मात केली. दिल्लीचा हा चौथा विजय ठरला. या विजयासह त्यांनी गुणतालिकेत पहिल्या स्थानावर झेप घेतली. या पराभवामुळे मुंबईचा संघ दुसऱ्यावरून तिसऱ्या स्थानावर आला. मुंबईचा हा दुसरा पराभव ठरला.

दिल्लीकडून मिळालेल्या १९३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या मुंबईला ८ बाद १६३ धावसंख्येपर्यंत मजल मारता आली. हेली मॅथ्यूज (२९ धावा), अमनज्योत कौर (४२ धावा), सजीवन सजना (नाबाद २४ धावा) यांच्याकडून थोडीफार झुंज मिळाली. यास्तिका भाटीया (६ धावा), नॅट सिव्हर (५ धावा), हरमनप्रीत कौर (६ धावा), अमेलिया केर (१७ धावा) या प्रमुख फलंदाजांना अपयश आले. त्यामुळे मुंबईचा पराभव झाला. जेस जोनासेन हिने २१ धावा देत तीन फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

त्याआधी मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. मेग लॅनिंग हिने ३८ चेंडूंमध्ये ६ चौकार व २ षटकारांसह ५३ धावांची खेळी केली. शेफाली वर्माने २८ धावांची, तर एलिस कॅप्सीने १९ धावांची खेळी केली. जेमिमा रॉड्रिग्ज हिने अवघ्या ३३ चेंडूंमध्ये ८ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ६९ धावांची फटकेबाजी केली. दिल्लीने २० षटकांत ४ बाद १९२ धावा फटकावल्या.

संक्षिप्त धावफलक : दिल्ली कॅपिटल्स २० षटकांत ४ बाद १९२ धावा (मेग लॅनिंग ५३, शेफाली वर्मा २८, एलिस कॅप्सी १९, जेमिमा रॉड्रिग्ज नाबाद ६९, पूजा वस्त्रकार १/२०) विजयी वि. मुंबई इंडियन्स २० षटकांत ८ बाद १६३ धावा (हेली मॅथ्यूज २९, अमनज्योत कौर ४२, सजीवन सजना नाबाद २४, जेस जोनासन ३/२१).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT