Sourav Ganguly X/DelhiCapitals
Cricket

IPL 2025: गांगुलीला कोच म्हणून केलं रिजेक्ट, दिल्लीचा शोध 'गंभीर'साठी?

Delhi Capitals Head Coach: रिकी पाँटिंग दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य प्रशिक्षक म्हणून पायउतार झाला आहे, त्यामुळे हे पद सध्या रिक्त आहे.

Pranali Kodre

Delhi Capitals does not want Sourav Ganguly as new head coach: इंडियन प्रीमियर लीगमधील संघ दिल्ली कॅपिटल्सने १८ व्या हंगामाआधी होणाऱ्या मेगा ऑक्शनपूर्वी मोठा निर्णय घेतला. दिल्लीने मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंगबरोबरचे नाते तोडले आहे. त्यामुळे दिल्ली संघात मुख्य प्रशिक्षक पद रिकामे झाले आहे.

पाँटिंग गेली ७ वर्षे या संघाचा मुख्य प्रशिक्षक होता. मात्र या ७ वर्षांच्या कार्यकाळानंतर त्याचा या संघाबरोबरचा प्रशिक्षक म्हणून प्रवास थांबला आहे.

यादरम्यान, दिल्लीचा क्रिकेट संचालक सौरव गांगुलीला हे पद मिळू शकते अशी चर्चा होती. गांगुलीनेही बंगाली वृत्तपत्राला दिलेल्या एका मुलाखतीत हे पद स्विकारण्याची इच्छा असल्याचे सुचक वक्तव्य केले होते.

मात्र, आता अशी माहिती मिळत आहे की दिल्ली कॅपिटल्स त्याचा मुख्य प्रशिक्षकपदासाठी विचार करत नाहीये. न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तानुसार दिल्लीचा गांगुलीला क्रिकेट संचालक आणि प्रशिक्षक अशी दुहेरी जबाबदारी देण्याचा विचार नाही.

गांगुली केवळ आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्सचाच नाही, तर या संघांच्या सिस्टर फ्रँचायझी दुबई कॅपिटल्स, प्रीटोरिया कॅपिटल्स यांचाही क्रिकेट संचालक आहे.

रिपोर्टनुसार एका सुत्राने सांगितले की 'गांगुलीच्या ताटात आधीच खुप गोष्टी आहेत. क्रिकेट संचालक म्हणून त्याला फ्रँचायझीसाठी बऱ्याच गोष्टींच्या योजना आखायच्या असतात.'

तसेच दिल्ली गौतम गंभीरप्रमाणे एखाद्या प्रशिक्षकाच्या शोधात आहे. गंभीरच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच आयपीएल २०२४ स्पर्धेचे विजेतेपद कोलकाता नाईट रायडर्सने मिळवले होते. यानंतर गंभीरला आता भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

सुत्राने सांगितले की 'संघाला अत्यंत आक्रमकपणे नेतृत्व करणाऱ्या प्रशिक्षकाची गरज आहे. जसे गौतम गंभीर करतो. तो एक मार्गदर्शक म्हणून इतका यशस्वी झाला यात आश्चर्याची गोष्ट नाही. तो खेळाडूंच्या आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत कामगिरीबाबत माहिती ठेवतो.'

'व्यवस्थापनाला प्रशिक्षकपदासाठी कोणतीही अस्थायी गोष्टी नको आहेत, कारण मेगा ऑक्शननंतर लगेच नवीन चक्र चालू होईल.'

दिल्लीबद्दल सांगायचे झाले, तर ते पहिल्या हंगामापासून आयपीएलमध्ये खेळत होते. दिल्ली फ्रँचायझीचे नाव पूर्वी दिल्ली डेअरडेविल्स होते, जे 2019 मध्ये बदलण्यात आले आणि दिल्ली कॅपिटल्स करण्यात आले. या संघाला आत्तापर्यंत १७ वर्षात एकदाही आयपीएलचे विजेतेपद जिंकता आलेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अय्यो, किती गोड! विकी-कतरिनाचाने शेअर केला मुलगा विहानचा पहिला फोटो, लेक दिसतो सेम टू सेम बाबासारखा

Samruddhi Magdum Death : लेकीच्या जन्माचा आनंद क्षणात विरला! आठ महिन्यांच्या गर्भवतीचा प्रसूतीवेळी अतिरक्तस्रावामुळे दुर्दैवी मृत्यू, मगदूम कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर

Rising Star Asia Cup: रिंकू सिंग भारतीय संघाचा उपकर्णधार! पाटीदारची अचानक माघार, सध्या निवड न करण्याची BCCI कडे विनंती

Ganga returns to Haridwar Har Ki Pauri : १८ दिवसांनंतर अखेर 'तिचे' पुनरागमन! ऐन दिवाळीच्या दिवशी वाहू लागला खळाळता प्रवाह; घाटांवर भाविकांचा महापूर

Pune Crime: लोणी काळभोरमध्ये खळबळ! खोकलाई चौकातून घरी निघालेली २७ वर्षीय विवाहिता बेपत्ता; अपहरणाचा संशय

SCROLL FOR NEXT