Virat Kohli DRS | India vs Sri Lanka Sakal
Cricket

IND vs SL: विराटच्या DRS वरून राडा! नॉटआऊट दिल्यानंतर श्रीलंकेच्या यष्टीरक्षकानं हेल्मेटच खाली फेकलं, पाहा Video

Virat Kohli DRS Call: भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या वनडेत विराट कोहलीच्या डीआरएसवरून वाद झाल्याचे दिसून आले.

Pranali Kodre

India vs Sri Lanka 2nd ODI: श्रीलंका क्रिकेट संघाने रविवारी (४ ऑगस्ट) भारताविरुद्ध दुसऱ्या वनडेत ३२ धावांनी विजय मिळवला. या विजयासह श्रीलंकेने वनडे मालिकेत १-० अशी आघाडीही घेतली आहे. दरम्यान, या सामन्यात एका वादग्रस्त घटनाही घडली.

झाले असे की श्रीलंकेने दिलेल्या २४१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताकडून रोहित शर्मा ६४ धावांवर बाद झाल्यानंतर विराट कोहली फलंदाजीला आला होता. यावेळी तो ११ धावांवर खेळत असताना अकिला धनंजयाच्या १५ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्याने शॉट खेळण्याचा प्रयत्न केला पण तो चूकला.

त्यावेळी चेंडू आधी पॅडला लागल्याचे समजून श्रीलंकेने पायचीतसाठी अपील केले. त्यावर पंचांनीही बाद दिले. मात्र विराटने डीआरएसची मागणी केली. त्यानंतर अल्ट्रा एजमध्ये चेंडू बॅडला हलका घासल्याचे दिसले. त्यामुळे थर्ड अंपायरने निर्णय बदलून विराटला नाबाद घोषित केले.

दरम्यान, यामुळे श्रीलंकेचा संघ वैतागलेला दिसला. श्रीलंकेचा कर्णधार पंचांशी चर्चाही करताना दिसला. तसेच प्रशिक्षक सनथ जयसूर्याही अंत्यंत निराश दिसला आणि त्याने फोर्थ अंपायरशी याबाबत चर्चाही केली.

याचदरम्यान श्रीलंकेचा यष्टीरक्षक कुशल मेंडिसने डोक्यातील हेल्मेट काढून रागात ते खालीही आपटले. त्याला असं चिडलेलं पाहून काही क्षणासाठी विराटही चकीत झाला होता.

दरम्यान, विराट बाद होता की नाही, यावर नंतर बरीच चर्चा झाली. कारण चेंडू त्याच्या बॅटला अगदी हलकाच स्पर्श करताना दिसला होता. त्यामुळे खरंच चेंडू बॅटला लागला की नाही, यावरून बरीच चर्चा झाली.

तथापि, सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर विराटला या जीवदानाचा फायदा घेता आला नाही. तो २०व्या षटकात १४ धावांवर जेफ्री वाँडरसेविरुद्ध खेळताना पायचीत झाला. त्यानंतरही केवळ अक्षर पटेलने ४४ धावांची झुंज दिली. मात्र बाकी कोणाला खास काही करता आले नाही. त्यामुळे भारतीय संघाचा डाव ४२.२ षटकातच २०८ धावांवर संपला.

श्रीलंकेकडून जेफ्री वाँडरसेने सर्वाधिक ६ विकेट्स घेतल्या, तर कर्णधार चरिथ असलंकाने ३ विकेट्स घेतल्या.

तत्पुर्वी प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेकडून अविष्का फर्नांडोने ४० आणि कामिंदू मेंडिसने ४० धावांची खेळी केली. तसेच कुशल मेंडिस (३०) आणि दुनिथ वेल्लालागे (३९) यांनीही छोटेखानी पण महत्त्वपूर्ण खेळी केल्या. त्यामुळे श्रीलंकेने ५० षटकात ९ बाद २४० धावा केल्या.

भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या, तर कुलदीप यादवने २ विकेट्स घेतल्या. तसेच मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav 2025: मोफत बस गणेशभक्तांसाठी की मतांसाठी? राजकीय स्पर्धा पेटली, राजकारण्यांमध्ये चढाओढ

Mumbai News: मुंबई पोलिसांची हद्द आता कोकणापर्यंत! पोलिस ठाणे उभे राहणार, कधी आणि कुठे? वाचा...

CM Devendra Fadnavis: राज्यातील ३,५०० गावे ‘इंटेलिजंट’ करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नागपुरातील सातनवरी येथे पहिला प्रयोग

Manoj Jarange-Patil: मराठा आरक्षण मिळवल्याशिवाय परतणार नाही: मनोज जरांगे-पाटील; प्रश्न निकाली न लागल्यास इतिहास घडवणार

Nikki Bhati Murder Case : महिलेबरोबर फिरताना पकडला गेला होता विपीन भाटी, तेव्हा....; निक्की हत्याकांड प्रकरणात मोठा खुलासा!

SCROLL FOR NEXT