Dwayne Bravo Retirement  esakal
Cricket

Dwayne Bravo Retirement : ड्वेन ब्राव्होची निवृत्ती; मैदान सोडताना लहान मुलासारखा रडला Video

DJ Bravo end his CPL career : ड्वेन ब्राव्हो हे नाव आपल्याला नवीन नाही... तो विंडीजचा खेळाडू असला तरी भारतीयांनी त्याला इंडियन प्रीमिअर लीगमध्ये भरभरून प्रेम दिलं.

Swadesh Ghanekar

Dwayne Bravo retirement from all forms of cricket : वेस्ट इंडिजच्या महान अष्टपैलू खेळाडूंपैकी एक ड्वेन ब्राव्होने काल सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. खरं तर त्याला कॅरेबियन प्रीमिअर लीगची मॅच खेळून निवृत्ती घ्यायची होती, परंतु दुखापतीमुळे त्याला आधीच माघार घ्यावी लागली. काल सहकाऱ्यांनी त्याला गार्ड ऑफ ऑनर दिला आणि त्यानंतर मैदानाबाहेर जाताना ब्राव्हो लहान मुलासारखा रडला...

ड्वेन ब्राव्हो हा जगातील महान अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे. ब्राव्होने CPL मध्येही भरपूर यश मिळवले आहे. या लीगमधील पाच विजेतेपदांमध्ये त्याचा सहभाग आहे. ब्राव्होने फार आधीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती, मात्र तो ट्वेंटी-२० लीग क्रिकेटमध्ये खेळत होता. त्याने मागच्या वर्षी आयपीएलमधूनही निवृत्ती घेतली होती. तो बरीच वर्ष चेन्नई सुपर किंग्सकडून खेळला.

"व्यावसायिक क्रिकेटर म्हणून २१ वर्षांचा हा एक अविश्वसनीय प्रवास आहे, या प्रवासात बरेच चढउतार पाहिले," असे ब्राव्होने Instagram पोस्टमध्ये लिहिले. तो पुढे म्हणतो, "मी माझे स्वप्न जगलो, हे माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे. मला हे नाते पुढे चालू ठेवायला आवडेल, परंतु वास्तविकतेचाही सामना करायला हवा आणि हिच ती वेळ आहे. मी माझ्या सहकाऱ्यांना, हत्यांना किंवा मी प्रतिनिधित्व करत असलेल्या संघांचे आभार मानतो. जड अंतःकरणाने, मी अधिकृतपणे निवृत्ती जाहीर करत आहे."

ड्वेन ब्राव्होने वेस्ट इंडिजसाठी ४० कसोटी, १६४ वन डे आणि ९१ ट्वेंटी-२० सामने खेळले. कसोटीत त्याने २२०० धावा आणि ८६ विकेट्स घेतल्या आहेत. वनडे फॉरमॅटमध्ये २९६८ धावांसह १९९ विकेट्स त्याच्या नावावर आहेत. आंतरराष्ट्री ट्वेंटी-२०त त्याने १२५५ धावा केल्या आहेत आणि ७८ विकेट्सही घेतल्या. CPL मध्ये त्याने १०६ सामन्यांमध्ये ११५५ धावा केल्या आहेत आणि १२९ विकेट्सही घेतल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman Nina Kutina: गोकर्ण जंगलाच्या गुहेत सापडलेली रशियन महिला ८ वर्ष स्वयंपाक कशी करायची? मुलींना काय खायला द्यायची?

'26 निष्पापांच्या हत्यांमागे पाकिस्तानचा हात, त्या दहशतवाद्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणार'; जम्मूच्या उपराज्यपालांचा कडक इशारा

Walking 10000 Steps: दररोज 10,000 पावले चालल्यास काय होईल? डॉक्टरांनी सांगितले शरीरात दिसणारे 5 बदल

Gokul Milk Politics : आप्पा महाडिकांनी थेट मुश्रीफांनाच घेतलं अंगावर, कारभार चांगला, मग ‘टोकण’ कशासाठी?

Nagpur Crime: कर्जदाराचे अपहरण, जिवे मारण्याची धमकी; सावकारासह चौघांना अटक

SCROLL FOR NEXT