Gus Atkinson | James Anderson | England Cricket Team Sakal
Cricket

James Anderson ची शेवटची कसोटी अन् इंग्लंडला मिळाला भविष्याचा स्टार! पदार्पणात 7 विकेट्स घेत विंडीजला केले गपगार

England vs West Indies Test : कसोटी क्रिकेटमध्ये ७०१ विकेट्स घेणारा एकमेव जलदगती गोलंदाज जेम्स अँडरसन आज शेवटची आंतरराष्ट्रीय कसोटी खेळण्यासाठी मैदानावर उतरला.

सकाळ डिजिटल टीम

England vs West Indies Test James Anderson Last Test : १८७ कसोटीत ७०१ विकेट्स घेणारा जेम्स अँडरसन आज शेवटची आंतरराष्ट्रीय कसोटी मॅच खेळण्यासाठी क्रिकेटची पंढरी लॉर्ड्सवर उतरला... टाळ्यांच्या कडकडाटात प्रेक्षकांनी त्याचे स्वागत केले.

इंग्लंड व वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी गार्ड ऑफ ऑनर दिला. महान गोलंदाज एकीकडे निवृत्त होत असताना इंग्लंडला गस अ‍ॅटकिनसनच्या ( Gus Atkinson) रुपाने उगवता तारा मिळाला आहे. अ‍ॅटकिनसनने पदार्पणाच्या कसोटीत ७ विकेस्ट घेताना वेस्ट इंडिजला गपगार केले.

विंडीजचा पहिला डाव ४१.४ षटकांत १२१ धावांवर गडगडला. अ‍ॅटकिनसनने १२-५-४५-७ अशी भन्नाट स्पेल टाकली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे २१ वर्षांपूर्वी जेम्स अँडरसनने लॉर्ड्सवर कसोटी पदार्पणात पाच विकेट्स घेतल्या होत्या आणि त्यानंतर लॉर्ड्सवर पदार्पणात असा पराक्रम करणारा गस अ‍ॅटकिनसन हा पहिलाच गोलंदाज ठरला.

याच सामन्यात इंग्लंडचा गोलंदाज ख्रिस वोक्सने २९ धावा देत १ विकेट घेतली आणि नावावर पराक्रम नोंदवला. इंग्लंडकडून कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये १००० हून अधिक धावा व १५० हून अधिक विकेट्स नावावर असणारा तो अँड्य्रू फ्लिंटॉफनंतर दुसरा गोलंदाज ठरला.

वेस्ट इंडिजकडून मिकेल लुईस ( २७), काव्हेम हॉज ( २४) व अलिक अथानाझे ( २३) यांनी चांगला खेळल केला.

लॉर्ड्सवर कसोटी पदार्पणात सर्वोत्तम कामगिरी (एका इनिंग्जमध्ये)

  • ८-५३ - बॉब मॅसी ( ऑस्ट्रेलिया) वि. इंग्लंड, १९७२

  • ८-८४ - बॉब मॅसी ( ऑस्ट्रेलिया) वि. इंग्लंड, १९७२

  • ७-४३ - डॉमिनिक कॉर्क ( इंग्लंड) वि. वेस्ट इंडिज, १९९५

  • ७-४५ - गस अ‍ॅटकिनसन ( इंग्लंड) वि. वेस्ट इंडिज, २०२४

  • ७-४९ - अ‍ॅलेक बेडसर ( इंग्लंड) वि. भारत, १९४६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT