Ben Stokes  Sakal
Cricket

बेन स्टोक्स Mumbai Indians फ्रँचायझीकडून खेळणार? समोर आले मोठे अपडेट्स

Ben Stokes: इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्स मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीकडून खेळताना दिसण्याची शक्यता आहे.

Pranali Kodre

Ben Stokes is set to sign for MI Cape Town: आयपीएलप्रमाणेच आता जगभरात अनेक टी२० स्पर्धा खेळल्या जात आहेत. त्यातील महत्त्वाच्या स्पर्धा म्हणजे इंटरनॅशनल लीग टी२० आणि साऊथ आफ्रिका टी२०.

या स्पर्धांमध्येही आयपीएलमधील संघांच्या सिस्टर फ्रँचायझी देखील आहे. दरम्यान, या स्पर्धांमध्ये आता आगामी हंगामात अनेक इंग्लंडचे खेळाडू खेळताना दिसण्याची शक्यता आहे.

इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सशी SA20 2025 हंगामासाठी एमआय केप टाऊन हा संघ करार करण्याची शक्यता आहे. एमआय केप टाऊन ही आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाची सिस्टर फ्रँचायझी आहे.

सध्या जे मिडिया रिपोर्ट्स समोर आले आहेत, त्यानुसार स्टोक्सला 800,000 पाउंड्सची ऑफर एमआय केप टाऊनने दिली आहे, जी ऑफर स्टोक्स स्वीकारण्याची दाट शक्यता आहे. एमआय केप टाऊन संघात आधीच कायरन पोलार्ड, राशिद खान, कागिसो रबाडा, जोफ्रा आर्चर असे खेळाडू आहेत.

मात्र, असे असले तरी २०२४ च्या हंगामात मात्र हा संघ गुणतालिकेत सर्वात खाली राहिला होता. त्यामुळे आगामी हंगामासाठी काही मोठे बदल या संघात होण्याची शक्यता आहे. दरम्यान, हा करार करण्यापूर्वी स्टोक्सची इंग्लंड क्रिकेट बोर्डासह नवीन केंद्रिय कराराबाबत चर्चा सुरू आहे.

टेलिग्राफने दिलेल्या वृत्तानुसार इंग्लंड क्रिकेट बोर्डाने २०२३ मध्ये स्टोक्सला मल्टी-इयर कराराबाबत विचारले होते. पण त्याने तो नाकारला होता. स्टोक्स आता मर्यादीत षटकांच्या क्रिकेटसाठी इंग्लंडच्या संघाचा भाग नाही. त्यामुळे तो फक्त नियमितपणे कसोटी क्रिकेट खेळताना दिसतो.

डिसेंबरच्या आधीच इंग्लंडचे पाकिस्तान आणि न्यूझीलंड या संघाविरूद्धचे कसोटी मालिका खेळून होणार आहेत. त्यानंतर २०२५ च्या सुरुवातीला इंग्लंडला भारतात वनडे आणि टी२० मालिका खेळायची आहे. त्यामुळे जे खेळाडू वनडे आणि टी२० संघाचा भाग नाहीत, ते इंग्लंडचे खेळाडू SA20 स्पर्धेसाठी उपलब्ध राहू शकतात.

इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रुटनेही SA20 स्पर्धेसाठी राजस्थान रॉयल्सची सिस्टर फ्रँचायझी पार्ल रॉयल्स संघासह आगामी हंगामासाठी करार केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT