Ireland vs Zimbabwe | Funny Cricket Video Sakal
Cricket

IRE vs ZIM: चौकार रोखला तरी बॅटरला मिळाल्या 5 धावा, नक्की ट्वीस्ट आला कुठे? एकदा Video पाहाच

Fielder Saves Boundary but Batters Take 5 runs: नुकत्याच झालेल्या एका कसोटी सामन्यात एक अजब घटना घडली. क्षेत्ररक्षकाने चौकार अडवूनही फलंदाजांना ५ धावा काढल्या, एकदा पाहा.

Pranali Kodre

Funny Cricket Video: झिम्बाब्वे क्रिकेट संघ नुकताच एकमेव कसोटी सामना खेळण्यासाठी आयर्लंड़ दौऱ्यावर गेला होता. कसोटी सामन्यात आयर्लंडने ४ विकेट्सने विजय मिळवला. पण या सामन्यात एक मजेशीर घटनाही घडली. झिम्बाब्वेचा एका क्षेत्ररक्षकाने चौकार आडवला, पण तरी फलंदाजाला ५ धावा मिळाल्या. पण हे कसं झालं? जाणून घेऊ.

झाले असे की आयर्लंडला विजयासाठी दुसऱ्या डावात १५८ धावांचे लक्ष्य होते. त्यावेळी १७ षटकांपर्यंत आयर्लंडने ७३ धावांत ५ विकेट्स गमावल्या होत्या. अशावेळी आयर्लंडचे अँडी मॅकब्रायन आणि लॉरकन टकर फलंदाजी करत होते.

त्यावेळी १८ व्या षटकात झिम्बाब्वेकडून रिचर्ड एनगवारा गोलंदाजी करण्यासाठी आला. त्याच्या दुसऱ्या चेंडूवर मॅकब्रायनने कव्हरला शॉट खेळला. त्यावेळी झिम्बाब्वेच्या क्षेत्ररक्षकाने चौकार रोखण्याचा पूर्ण प्रयत्न केला. त्याने चेंडू सीमापार जाण्यापूर्वीच रोखला होता.

मात्र चेंडू रोखल्यानंतर क्षेत्ररक्षक नियंत्रण सुटून ब्राऊंड्रीच्या होर्डिंगबाहेर गेला. तो परत मैदानात येऊन चेंडू हातात घेईपर्यंत इतके मॅकब्रायन आणि टकर यांनी पळत पाच धावाही काढल्या.

आर्श्चर्याची गोष्ट म्हणजे जेव्हा झिम्बाब्वेच्या क्षेत्ररक्षकाने चेंडू आडवला, त्याला त्याला बॅकअपला दुसरा कोणताही क्षेत्ररक्षक तिथे नव्हता. त्यामुळे मिळालेल्या वेळेत आयर्लंडच्या फलंदाजांना ५ धावा काढता आल्या. या मजेशीर घटनेचा व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे.

दरम्यान सामन्याबद्दल सांगायचं झालं तर झिम्बाब्वेने दिलेलं १५८ धावांचे लक्ष्य आयर्लंडने ३६.१ षटकात ६ विकेट्स गमावत पूर्ण केले. टकरने ५६ धावा केल्या, तर मॅकब्रायनने ५५ धावा केल्या. झिम्बाब्वेकडून दुसऱ्या डावात एनगवाराने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.

तत्पुर्वी या सामन्यात झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात प्रिन्स मस्वाउरेच्या ७४ धावांच्या खेळीच्या जोरावर सर्वबाद २१० धावा केल्या होत्या. त्यानंतर आयर्लंडने पीटर मूरने केलेल्या ७९ धावांच्या जोरावर पहिल्या डावात सर्वबाद २५० धावा करत ४० धावांची आघाडी घेतली होती.

पहिल्या डावात गोलंदाजी करताना आयर्लंडकडून बॅरी मॅककार्थी आणि अँडी मॅकब्रायन यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच झिम्बाब्वेकडून ब्लेसिंग बुझराबनी आणि तनका चिवांगा यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.

दरम्यान, दुसऱ्या डावात झिम्बाब्वेने सर्वबाद १९७ धावा केल्या. त्यांच्याकडून डायन मेयर्सने ५७ धावांची खेळी केली. मात्र पहिल्या डावातील ४० धावांच्या पिछाडीमुळे त्यांना आयर्लंडसमोर १५८ धावांचेच लक्ष्य ठेवता आले. आयर्लंडकडून या डावात मॅकब्रायनने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं, राज ठाकरेंकडून भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांवर टीका

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT