Joe Burns | Usman Khawaja Sakal
Cricket

Australia Cricket: भावासाठी ऑस्ट्रेलिया सोडून आता 'या' देशासाठी खेळणार स्टार ओपनर! भारताविरुद्ध खेळलेला अखेरचा सामना

Joe Burns:ऑस्ट्रेलियाच्या माजी सलामीवीराने आता दुसऱ्या देशाकडून क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला असून त्या देशाला 2026 टी20 वर्ल्ड कपची पात्रता मिळवून देण्यासाठी तो प्रयत्न करेल.

Pranali Kodre

Joe Burns: ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर जो बर्नने मोठा निर्णय घेतला आहे. त्याने आता ऑस्ट्रेलिया सोडून इटलीकडून खेळण्याचा निर्णय घेतलाय. यामागेचे कारणही त्याने स्पष्ट केले आहे.

दरम्यान आता तो इटली संघाकडून खेळताना त्यांना 2026 टी20 वर्ल्ड कपची पात्रता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल.

त्याने हा निर्णय त्याच्या भावाच्या आणि आजोबांच्या सन्मानार्थ घेतला आहे. त्याच्या भावाचे यावर्षी फेब्रुवारीमध्ये निधन झाले होते. तो भावाच्या स्मृतीप्रीत्यर्थ 85 क्रमांकाची जर्सीही घालणार आहे.

बर्न्सचे कुटुंब मुळचे इटलीचे असून त्याचे आजी आजोबा अनेक वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक झाले होते. त्यामुळे जो बर्न्सचा जन्मही ऑस्ट्रेलियामध्येच झाला. ऑस्ट्रेलियामध्येच त्याने क्रिकेटचे धडे गिरवले.

तसेच ऑस्ट्रेलिया संघाचे आंतरराष्ट्रीय स्थरावर प्रतिनिधित्व केले. त्याने 23 कसोटी सामने खेळताना 4 शतकांसह 1442 धावा केल्या. तो ऑस्ट्रेलियाकडून अखेरचा सामना 2020 मध्ये भारताविरुद्ध खेळला.

दरम्यान, बर्न्सला त्याचा देशांतर्गत संघ क्विन्सलँडने गेल्या हंगामात खेळण्याची संधी दिली नव्हती. तसेच त्याला 2024-25 वर्षाचा करारही दिलेला नाही.

त्यानंतर मंगळवारी (28 मे) त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट करत तो इटलीकडून खेळणार असल्याचे स्पष्ट केले. त्याने त्याच्या इटली संघाच्या जर्सीचा आणि त्याच्या भावाच्या क्लब क्रिकेटमधील संघाच्या जर्सीचा फोटो शेअर केला आहे, ज्यावर 85 क्रमांकही लिहिला आहे.

तसेच त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की 'हा केवळ क्रमांक आणि जर्सी नाही. हे त्या लोकांसाठी आहे, जे वरून अभिमानाने पाहात आहेत. फेब्रुवारीमध्ये माझ्या भावाचे निधन झाले. 85 हा क्रमांक त्याने त्याच्या अखेरच्या संघाकडून नॉर्दन फेडरल्सकडून खेळताना घातला होता आणि 1985 त्याचे जन्मसाल देखील आहे.'

बर्न्सने पुढे लिहिले की त्याच्या भावाच्या निधनानंतरचा काळ त्याच्यासाठी सर्वात कठीण काळ ठरला आहे. पण त्याच्या क्रमांकाची जर्सी त्याला ताकद देईल.त्याचबरोबर त्याने सांगितले की त्याच्या भावाबरोबर खेळत त्याला क्रिकेटची आवड लागलेली.

त्याचबरोबर त्याचे आजी-आजोबा इटलीहून ऑस्ट्रेलियात स्थायिक झाल्याचेही त्याने सांगितले. तसेच आता तो इटलीकडून खेळणार असल्याचा खुलासाही त्याने केला.

तो कॅप्शनच्या अखेरीस म्हणाला, 'रोमचे मैदान कदाचीत गॅबा, मेलबर्न किंवा आमच्या अंगणापेक्षा लांब असेल, पण मला पुन्हा घरी आल्याच्या भावना आहेत. '

बर्न्स त्याच्या आईच्या वारशामुळे इटलीसाठी खेळण्यास पात्र ठरला आहे. आता तो जून महिन्यात 2026 टी20 वर्ल्ड कपसाठी सब रिजनल क्वालिफायर्समध्ये खेळण्यास सज्ज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: ७ सुवर्ण, ३ रौप्य.. बॉक्सिंगपटूंची ऐतिहासिक कामगिरी; भारताची Medal Table मध्ये उत्तुंग भरारी, बघा कितव्या स्थानावर पोहोचले

Commonwealth Games 2026: सचिन... सचिन... पंचांनी १ गुण वजा केला, भारताचा बॉक्सर पेटला; तिसऱ्या फेरीत मुक्क्यांची बरसात करून जिंकले सुवर्ण...

Education Initiative: चिमुकल्या इरफानच्या आठवणीत अमळनेरमध्ये शिक्षणसेवेचा संकल्प; गरजू विद्यार्थ्यांना मोफत साहित्य वाटप उपक्रम

Commonwealth Games 2026: धक्कादायक... ऑलिम्पिक पदक विजेत्या लव्हलिना बोरगोहैनचे सुवर्ण हुकलं...

Video: जुनं वचन पाळलं! मित्राची सैन्यात निवड होताच खांद्यावर बसवून काढली गावभर मिरवणूक; कोल्हापूरचा व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT