Virat Kohli - Gautam Gambhir | Team India Sakal
Cricket

Gautam Gambhir: 'पदार्पणावेळी होती तशीच भूक अजूनही...', विराटच्या टीकाकारांना गंभीरचं सडेतोड उत्तर

Gautam Gambhir backed Virat Kohli: विराट कोहलीच्या कसोटीतील फॉर्मवर सध्या टीका होत आहे. मात्र, त्याच्या टिकाकारांना भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने सडेतोड उत्तर दिले आहे.

Pranali Kodre

Gautam Gambhir on Virat Kohli: भारत विरुद्ध न्यूझीलंड संधात १६ ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे. या मालिकेनंतर भारताला ५ कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जायचे आहे. मात्र सध्या भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या कसोटीतील फॉर्मवर टीका होत आहे.

विराटला गेल्या ४ वर्षात कसोटीमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. त्याने यावर्षात ३ कसोटीत केवळ १५७ धावा केल्या आहेत. अशात त्याच्या फॉर्मवर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

मात्र, भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने विराटचे समर्थन करत जो जागतिक दर्जाच्या खेळाडू असल्याचे म्हटले आहे. तसेच त्याच्यामध्ये अजूनही धावांची भूक पूर्वीप्रमाणेच असल्याचे त्याने सांगितले आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी गंभीर म्हणाला, 'विराट हा नेहमीच जागतिक दर्जाचा खेळाड़ू राहिला आहे. त्याने दीर्घकाळापासून चांगली कामगिरी केली आहे आणि पदार्पणावेळी जशी धावांची भूक त्याच्यात होती, तशी ती अजूनही कायम आहे.'

'मला अजूनही आठवतं जेव्हा त्याने श्रीलंकेविरुद्ध पदार्पण केले होते, तेव्हा त्याच्याबरोबर सलामीला मी फलंदाजी केली होती. तेव्हापासून आत्तापर्यंत त्याची भूक कायम आहे. हिच गोष्ट आहे जी त्याला जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक बनवते.'

'मला खात्री आहे की या मालिकेतही धावा करण्यासाठी आणि पुढे ऑस्ट्रेलियाविरुद्धही चांगला फॉर्म राखण्यासाठी तो भूकेला असेल. आणि सर्वांनाच हे माहित असेल की जेव्हा तो धावा करतो, तेव्हा तो किती सातत्यपूर्ण कामगिरी करू शकतो.'

विराटने आत्तापर्यंत ११ कसोटीत ४५.५७ च्या सरासराने ८६६ धावा केल्या आहेत. यात तीन शतके केली आहेत, तर तीन अर्धशतके केली आहेत.

गंभीरने असंही म्हटलं की प्लेइंग इलेव्हनमध्ये परिस्थिती पाहून खेळाडूंना संधी दिली जाते. त्यामुळे गरजेनुसार गोलंदाजांना संधी दिली जाईल.

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप

राखीव- हर्षित राणा, मयंक यादव, नितीश कुमार रेड्डी, प्रसिद्ध कृष्णा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT