Gautam Gambhir esakal
Cricket

Gautam Gambhir Quit Politics : मोदी, शहा की जेटली... गंभीरचा राजकीय गॉड फादर कोण? क्रिकेटचं मैदान सोडून 'तो' राजकारणात कसा आला?

Gautam Gambhir Arun Jaitley : गंभीरनं प्रथेप्रमाणं पंतप्रधान नरेंद्र मोदींच नाव घेतलं मात्र निवृत्तीनंतर अवघ्या काही महिन्यात तो कसा अन् कोणामुळं भाजपमध्ये आला?

अनिरुद्ध संकपाळ

Gautam Gambhir Quit Politics Arun Jaitley : 'मी पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांना विनंती केली की मला राजकीय जबाबदारीतून मुक्त करा. मला माझ्या क्रिकेटमधील इतर जबाबदाऱ्यांसाठी वेळ द्यायचा आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहाजींचा मनापासून आभारी आहे की त्यांनी मला लोकांची सेवा करण्याची संधी दिली. जय हिंद!' ही आहे गौतम गंभीरची नवी पोस्ट!

गंभीरने 2018 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती आणि 22 मार्च रोजी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आज दिनांक 2 मार्च 2024 मध्ये त्याने राजकारणाला राम राम ठोकला आहे. त्याची राजकीय कारकीर्द ही अवघी पाच वर्षाची ठरली! आपल्या पोस्टमध्ये जरी गंभीरने मोदी अन् शहांचा उल्लेख केला असला तरी मुळात तो त्याचे गॉडफादर समजले जाणारे अरूण जेटलींचे बोट धरून राजकारणात आला.

ज्यावेळी गौतम गंभीरने भाजपमध्ये प्रवेश केला त्यावेळी तत्कालीन अर्थमंत्री अरूण जेटली उपस्थित होते. अरूण जेटली अन् गौतम गंभीरचं नातं घट्ट होण्यात दिल्ली डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचा मोलाचा वाटा आहे. ज्यावेळी गौतम गंभीरची क्रिकेटमधील कारकीर्द फुलत होती त्यावेळी अरूण जेटली हे दिल्ली डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे अध्य क्ष होते. अरूण जेटली यांनी तब्बल 13 वर्षे डीडीसीएचे अध्यक्षपद भुषवलं.

नाव घेतलं मोदींच मात्र...

गौतम गंभीर भाजपत प्रवेश करताना प्रथेप्रमाणे म्हणाला होता की, मी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामाने आणि दूरदृष्टीने प्रभावित झालो आहे. मी क्रिकेटच्या मैदानात देशासाठी योगदान दिलं आहे आता मला देशातील लोकांसाठी काम करण्याची इच्छा आहे.' जरी गंभीरनं मोदींनी प्रभावित केलं असं म्हटलं असलं तरी तो भाजप आणि दिल्लीच्या राजकारणात फक्त आणि फक्त अरूण जेटलींमुळेच आला होता.

भाजपची ओळख करून देणारे अरूण जेटली गौतम गंभीरच्या पक्षप्रवेशावर म्हणाले होते की, 'गंभीरने त्याच्या कारकीर्दीत उत्तम कामगिरी केली आहे. पक्षाला आशा आहे की त्याच्या गुणांचा पक्षाला फायदाच होईल.'

ज्यावेळी फिरोजशाह कोटला स्टेडियमचं नाव बदलून अरूण जेटली करण्यात आलं त्यानंतर स्टेडियमच्या एका स्टँडला गौतम गंभीरचं देखील नाव देण्यात आलं होतं. त्यावेळी गंभीरने अरूण जेटली हे माझ्यासाठी पित्यासमान आहेत असे म्हटलं होतं. यावरून या दोघांमधील संबंध स्पष्ट होतात. (Cricket Marathi News)

डीडीसीएचं राजकारण अन् गंभीर

अरूण जेटली यांनी सलग 13 वर्षे डीडीसीएचे अध्यक्षपद भुषवले होते. मात्र ते अर्थमंत्री झाल्यानंतर अरूण जेटली यांना डीडीसीएचे पद सोडावे लागले होते. त्यानंतर आप की अदालत फेम रजत शर्मांची अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. अन् तेथूनच डीडीसीएचं राजकारण बदललं. रजत शर्माचे प्रतिस्पर्धी हे मदन लाल हे त्यांचे प्रतिस्पर्धी होते. गौतम गंभीरचं देखील नाव चर्चेत येत होतं.

अखेर रजत शर्मांनी डीडीसीएत अनेक लोकं पाय ओढतात म्हणत राजीनामा दिला होता. शर्मांनी गेल्या वर्षी विराटसोबत गंभीरचा वाद झाल्यानंतरही ट्विट करून गंभरीवर टीका केली होती. त्यानंतर गंभीरने त्यांना पळपुटा म्हणत डिवचले होते. या टिवटिवाटानंतर गंभीर दिल्ली क्रिकेट असोसिएशनमध्ये सक्रीय होणार अशी चर्चा होती. आता गंभीरनं राजकारण सोडून क्रिकेटवर लक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे!

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Live News : अवमानना याचिकेवर सुप्रीम कोर्टाची दिल्ली पोलिसांना नोटीस

RBI Special Window: रिझर्व्ह बँकेची ‘स्पेशल विंडो;तेल कंपन्यांना होणार डॉलरचा अखंडित पुरवठा

Amravati Crime: अमरावतीत आयटी इंजिनिअरने आईला संपवलं, स्वत:च पोलिसांना जाऊन सांगितलं

IND A vs AUS A: सूर्यांश शेडगेची झुंज! भारत अ संघाने ऑस्ट्रेलियासमोर ठेवलं २७६ धावांचं लक्ष्य

Jharkhand Tribal Woman : आदिवासी महिलेला पोलिस ठाण्यात उलटे टांगले अन्... पोलिसांच्या धक्कादायक कृत्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल

SCROLL FOR NEXT