Gautam Gambhir | Team India Sakal
Cricket

Team India Coach: गौतम गंभीर भारतीय संघाच्या कोचसाठी अर्ज करण्यास तयार, पण घातली फक्त एक अट?

Gautam Gambhir: बीसीसीआय सध्या भारतीय संघासाठी प्रशिक्षकाच्या शोधात आहे. या पदासाठी गौतम गंभीरच्या नावाचीही जोरदार चर्चा आहे.

Pranali Kodre

Team India Coach: भारतीय क्रिकेट नियमाक मंडळ (BCCI) सध्या भारतीय पुरुष क्रिकेट संघासाठी नव्या मुख्य प्रशिक्षकाच्या शोधात आहे. काही दिवसांपूर्वीच यासाठी उमेदवारी अर्ज बीसीसीआयने मागवले आहेत. यानंतर आता याबाबत अनेक नवनवीन अपडेट समोर येत आहेत.

सध्या राहुल द्रविड भारतीय संघाचा प्रशिक्षक आहे. पण त्याचा करार जून २०२४ पर्यंत आहे. तसेच त्यानंतर तो पुन्हा प्रशिक्षकपदासाठी अर्ज करणार नसल्याचे समजत आहे.

त्यामुळे आता भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अनेक मोठी नावे समोर येत आहे. त्यातच जस्टीन लँगर, रिकी पाँटिंग, व्हीव्हीएस लक्ष्मण, कुमार संगकारा अशा अनेक दिग्गजांची नावेही चर्चेत होती. परंतु, त्यांनी अर्ज करण्यास नकार दिलेला आहे.

गंभीर होणार नवा प्रशिक्षक?

दरम्यान आता कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटॉर गौतम गंभीरच्या नावाचीही जोरदार चर्चा होत आहे. दैनिक जागरणने दिलेल्या वृत्तानुसार गंभीरशी बीसीसीआयकडून संपर्क साधण्यात आला आहे. तसेच तो हे पद स्विकारण्यासाठी तयारही आहे.

पण सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जर सर्व गोष्टी योग्य झाल्या आणि बीसीसीआय जर त्यालाच हे पद मिळेल, अशा खात्रीचे संकेत देणार असेल, तरच तो 27 मे रोजी या पदासाठी अर्ज करेल.

तथापि, हे देखील लक्षात घेणे गरजेचे आहे की जर गंभीर भारताचा नवा प्रशिक्षक झाला, तर त्याला आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स संघाचे मेंटॉरचे पद सोडावे लागणार आहे. पण त्यासाठी त्याला संघमालक शाहरुख खानशी देखील चर्चा करावी लागेल.

यामागे कारण असे की मिडिया रिपोर्ट्सनुसार शाहरुखची इच्छा आहे की गंभीर कमीत कमी 10 वर्षेतरी कोलकाता संघाबरोबर रहावा. याबद्दलचा प्रस्ताव आधीच शाहरुखने गंभीरला दिलेला होता.

त्यामुळे आता गंभीर भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज करणार की नाही, हे पाहावे लागेल.

दरम्यान भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी उमेदवारी अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 मे आहे. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार ज्याची प्रशिक्षक म्हणून निवड होईल, त्याच्याबरोबरचा पहिला करार साडेतीन वर्षांसाठी असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Orders: 5 कोटींमध्ये संपला दशकभराचा वाद! सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, मुंबईतील फ्लॅटही सोडावा लागणार

Monsoon Rain Formation : 'मॉन्सून'चा पाऊस ढगांत कसा तयार होतो? पावसाचे रहस्य उलगडले; हवामानाचा अचूक अंदाज वर्तविणे आता होणार अधिक सोपे

Maharashtra Pilgrims Accident : तीर्थयात्रा ठरली अखेरची! महाराष्ट्राच्या भाविकांच्या बसचा उत्तर प्रदेशमध्ये भीषण अपघात; २ ठार, ३५ जखमी

Nanded News: जिल्ह्यात सव्वा लाख मेट्रिक टन खतसाठा; खरीप हंगामासाठी मुबलक साठा; तुटवडा भासणार नाही

Rohit Pawar: पार्थ पवार यांच्या विधानाबद्दल रोहित पवारांची दिलगिरी; आगामी कालावधीत सर्वांनी एकत्र येणे गरजेच!

SCROLL FOR NEXT