Gautam Gambhir | MS Dhoni Sakal
Cricket

MS Dhoni: गंभीर म्हणतोय, 'धोनी भारताचा सर्वोत्तम कर्णधार...'; कॅप्टनकूलच्या वाढदिवशी 'तो' Video आला समोर

Gautam Gambhir on MS Dhoni: गौतम गंभीरने धोनीला भारताचा सर्वोत्तम कर्णधार म्हटले असून त्याचं कौतुकही केलं आहे.

Pranali Kodre

Gautam Gambhir on MS Dhoni: भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने रविवारी (७ जुलै) त्याचा ४३ वा वाढदिवस साजरा केला. त्याच्या वाढदिवसानिमित्त अनेकांनी विविध स्वरुपात शुभेच्छा दिल्या आहेत. आजी-माजी क्रिकेटपटूंनीही त्याच्यासाठी खास पोस्टही शेअर केल्या आहेत.

दरम्यान, त्याच्या वाढदिवसानिमित्त एक व्हिडिओ स्टार स्पोर्ट्सनेही शेअर केला असून त्यात माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरनेही धोनीचे भरभरून कौतुक केले आहे.

खरंतर धोनी आणि गंभीर यांचं नातं क्रिकेट चाहत्यांसाठी नेहमीच एक कोडं राहिलं आहे. धोनीने कधी यावर भाष्य केलं नसलं, तरी गंभीर कधी धोनीबद्दल कौतुक करताना, तर कधी टीका करताना दिसतो. त्याचमुळे त्यांच्यातील नातं नेहमीच क्रिकेट चाहत्यांसाठी कुतुहालाचा विषय राहिला आहे.

दरम्यान, स्टार स्पोर्ट्सच्या व्हिडिओमध्ये गंभीरने धोनीबद्दल म्हणाला, 'अनेक कर्णधार येतील आणि जातील, पण भारतीय संघासाठी एमएस धोनीने केलेल्या विक्रमाची बरोबरी कोणाला करणे फार कठीण आहे. तुम्ही कसोटीत अव्वल बनू शकता, परदेशात सामने जिंकू शकता. पण दोन आयसीसी वर्ल्ड कप आणि एक चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणे, यापेक्षा मोठे यश असू शकत नाही.'

तो पुढे म्हणाला, 'आम्ही एकत्र काही शानदार क्षण जगलो आहे. मग ते टी२० वर्ल्ड कप, वनडे वर्ल्ड कप जिंकणे असो, ऑस्ट्रेलियात सीबी सिरिज असो, न्यूझीलंडमध्ये कसोटी मालिका जिंकणे, दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका अनिर्णित करणे, आशिया चषक जिंकणे, असे कितीतरी क्षण आहेत. तो कदाचीत भारताला मिळालेला सर्वोत्तम कर्णधार आहे.'

दरम्यान, या व्हिडिओमध्ये इरफान पठाण, ड्वेन ब्रावो आणि नासिर हुसेन यांनीही धोनीचे कौतुक केल्याचे दिसत आहे.

भारताने जेव्हा २००७ साली टी२० वर्ल्ड कप आणि २०११ वनडे वर्ल्ड कप एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकला होता, तेव्हा गंभीरने त्या विजयांमध्ये मोलाचा वाटा उचलला होता. दोन्ही स्पर्धांच्या अंतिम सामन्यात गंभीर भारताकडून सर्वोच्च खेळी करणारा खेळाडू होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Vande Bharat News: पुणे रेल्वे स्थानकावर मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचा अपघात कसा झाला? कारण आलं समोर, चौकशीचे आदेश

Axar Patel Reaction : मलाच काही समजत नाहीए...! RCB ने दिलेल्या धक्क्यानंतर अक्षर पटेल गोंधळला; म्हणतो, आता काय पुढे...

Pune Charity Commissioner : पारदर्शक न्यायदान हाच न्यायव्यवस्थेचा कणा : पुणे विभागाचे सह धर्मादाय आयुक्त दिनेश कोठलीकर यांचा कार्यभार स्वीकारताना निर्धार

Virat Kohli Record! विराट कोहलीने IPL इतिहासात कोणालाच न जमलेला विक्रम केला, पहिला फलंदाज ठरला; रोहित खूपच लांब राहिला

Mohol Crime : पैशाच्या वादातून एकाचा खून, एक गंभीर जखमी; आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

SCROLL FOR NEXT