Gautam Gambhir Natasha Jain Sakal
Cricket

Gautam Gambhir Coach: 'कारण तो नेतृत्वासाठी...', गंभीर भारतीय संघाचा प्रशिक्षक बनल्यानंतर पत्नी नताशाने काय केली पोस्ट?

Team India Head Coach: गौतम गंभीर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर त्याच्या पत्नीनेही प्रतिक्रिया दिली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Team India Head Coach Gautam Gambhir: भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरला आता भारतीय संघाच्या नवीन प्रशिक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

मंगळवारी (9 जुलै) बीसीसीआयचे सेक्रेटरी जय शहा यांनी जाहीर केले, श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या 27 जुलै पासून सुरू होणाऱ्या 3 वनडे आणि 3 टी-20 इंटरनॅशनल सामन्यांपासून गंभीर आपला पदभार स्विकारेल.

आयपीएल 2024 चे विजेते कोलकाता नाईट रायडर्स या फ्रेंचायजीसाठी गंभीर मार्गदर्शक म्हणून काम पाहात होता. त्याच्या मार्गदर्शनाखाली संघाने दमदार खेळ दाखवला होता.

आता भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षकपद मिळाल्यानंतर जगभरातील क्रिकेटपटूंनी त्याला शुभेच्छा दिल्या. अशातच त्याची पत्नी नताशा जैन हिनेही आपल्या भावना व्यक्त केल्या.

नताशाने ‘कारण तो नेतृत्वास पात्र आहे…’ असे म्हणत गंभीरसाठी अभिमान व पाठिंबा दर्शवत सोशल मिडीयावर पोस्ट शेअर केली आहे.

Natasha Jain Post

गंभीरने प्रत्यक्षात कधी कोणत्या संघाबरोबर प्रशिक्षक म्हणून काम केले नाही, पण त्याने आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या फ्रेंचायजीमध्ये मार्गदर्शक म्हणून काम केले आहे. त्याच्यामध्ये संघाला यशस्वी करण्याची क्षमता आहे, असे म्हणत जय शहा यांनी आता त्याच्यावर विश्वास दाखवला आहे.

गौतम गंभीरचे भारतीय क्रिकेटमध्येही मोठे योगदान राहिले आहे. अनेकदा त्याच्या खेळी भारतीय संघासाठी महत्त्वाच्या ठरल्या आहेत. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २० शतके करताना १० हजारांहून अधिक धावाही केल्या आहेत.

तो २००७ टी२० वर्ल्ड कप आणि २०११ वनडे वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाचा भागही होता. महत्त्वाचे म्हणजे २००७ टी२० वर्ल्ड कप आणि २०११ वनडे वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्याने भारतासाठी सर्वोच्च धावा केल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS Semi Final : हे, बरोबर नाय...! Smriti Mandhana अम्पायरवर नाराज झाली, ऑस्ट्रेलियाची चतुराई की भारताचं दुर्भाग्य?

Jio offers: जिओ ग्राहकांना खुशखबर! 35 हजार रुपयांची मोफत सेवा मिळणार; सुरुवातीला 'याच' ग्राहकांना फायदा

Vande Bharat Sleeper Train: आनंदाची बातमी! देशातील पहिली वंदे भारत स्लिपर ट्रेन रुळांवर लवकरच धावणार, अखेर रेल्वेकडून मान्यता

Justice Suryakant India’s New Chief Justice : न्यायमूर्ती सूर्यकांत असणार भारताचे नवे सरन्यायाधीश! राष्ट्रपतींनी केली नियुक्ती

Latest Marathi News Live Update : मोहोळ पोलीस ठाण्याच्यावतीने रन फॉर युनिटी उपक्रम

SCROLL FOR NEXT