Rohit Sharma Ritika Kapil Sharma Show esakal
Cricket

रोहित, मैं आपसे बोहोत प्यार करती हूँ! मुलीच्या प्रपोजनंतर Rohit Sharma लाजला पण, पत्नी रितिका... Video Viral

Rohit Sharma : कर्णधार रोहित शर्मा याने नुकतीच कपिल शर्मा शोमध्ये टीम इंडियाच्या सहकाऱ्यांसोबत हजेरी लावली होती. या कार्यक्रमात रोहितने धम्माल उडवली...

Swadesh Ghanekar

Girl proposed Rohit Sharma: कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप उंचावला आणि आता जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे ( WTC ) जेतेपद त्याला खुणावत आहे. रोहितच्या नेतृत्वाखआली २०२३ मध्ये भारताला वन डे वर्ल्ड कपमध्ये अविश्वसनीय कामगिरी करूनही फायनलमध्ये हार पत्करावी लागली होती. ते दुःख टीम इंडियाला सतावत होतेच, परंतु त्यातून सावरत २०२४ मध्ये भारताने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला. २०१३ नंतर भारताचे हे पहिले आयसीसी स्पर्धेचे जेतेपद ठरले, तर २००७ नंतर भारताने प्रथमच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला.

भारताने नुकतीच बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका २-० अशी जिंकून WTC तालिकेत अव्वल स्थानावरील पकड मजबूत केली. भारताला न्यूझीलंड ( ३ सामने घरचे मैदान) आणि ऑस्ट्रेलिया ( ५ सामने परदेशात ) यांच्याविरुद्ध कसोटी सामने खेळायचे आहेत. ट्वेंटी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यामुळे बांगलादेशविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत तो संघाचा भाग नाही. या दरम्यान त्याने कपिल शर्मा शोमध्ये अक्षर पटेल, सूर्यकुमार यादव, अर्शदीप सिंग व शिवम दुबे यांच्यासह हजेरी लावली.

यावेळी रोहित शर्मा म्हणाला, ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर बार्बाडोस येथे वादळ आलं होतं आणि आम्ही तिथे अडकलो होते. त्यावेळी हे खेळाडू १५ -१५ मिनिटांसाठी वर्ल्ड कप ट्रॉफी आपापल्या खोलीत घेऊन गेले होते. त्या सर्वांनी पलंगावर ट्रॉफीसोबत झोपल्याचे फोटो काढले आणि सोशल मीडियावर पोस्ट केले. हा वर्ल्ड कप जिंकण्यासाठी प्रत्येकाने प्रचंड मेहनत घेतली. आम्हाला वर्ल्ड कप जिंकायचाच होता.

यावेळी कपिल शर्मा शोमध्ये काम करणाऱ्या एका महिला अभिनेत्रीने रोहित मैं आपको बोहोत प्यार करता हूँ असे म्हटले. तेव्हा रोहित लाजला अन् त्याची पत्नी रितिकाही आश्चर्यचकित झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तान पुन्हा बनतोय 'दहशतवादाचा कारखाना'; जैश-लष्करचे तब्बल 300 नवे अड्डे उभारण्याची तयारी, कोण देतंय इतका पैसा?

हत्तीच्या हल्ल्यात पतीचा मृत्यू, ६ लाखांची नुकसान भरपाई; ६ महिलांचा दावा, म्हणतात,'मीच खरी पत्नी'

AUS vs SA, ODI: १८ षटकार अन् ३६ चौकार! हेड, मार्श अन् ग्रीन बरसले, ऑस्ट्रेलिया ४०० पार; अनेक विक्रम मोडले

Latest Marathi News Updates : साईबाबांच्या लाडू प्रसादामध्ये संस्थानकडून 50 टक्के वाढ

Ganpati Bappa 2025: गणपती बाप्पाला दुर्वा का अर्पण करतात? जाणून घ्या कारण आणि महत्त्व

SCROLL FOR NEXT