Harbhajan Singh | MS Dhoni Sakal
Cricket

MS Dhoni खूप पुढे आहे...! हरभजन सिंगने पाकिस्तानी पत्रकाराला धुतले

Harbhajan Singh Slams Pakistani Journalist: धोनी आणि रिझवान यांची तुलना करणाऱ्या पाकिस्तानी पत्रकाराला हरभजन सिंगने तिखट शब्दात उत्तर दिलं आहे.

Pranali Kodre

Harbhajan Singh Slams Pakistani Journalist: भारत आणि पाकिस्तान, हे दोन देश कोणत्याही क्षेत्रात कट्टर प्रतिस्पर्धीच समजले जातात. त्यातही क्रिकेट हा दोन्ही देशांसाठी जिव्हाळ्याचा विषय, पण जेव्हा हे दोन संघ एकमेकांसमोर उभे ठाकतात, तेव्हा मात्र, दोन्ही संघांचे चाहते आपल्या संघांसाठी जोरदार पाठिंबा देतात.

इतकंच नाही,तर अनेकदा दोन्ही देशांचे माजी खेळाडूही एकमेकांना डिवचताना दिसतात.

दरम्यान, अनेकदा दोन्ही देशातील खेळाडूंचीही तुलना होते. अशीच तुलना एका पाकिस्तानी पत्रकाराने भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक एमएस धोनी आणि पाकिस्तानचा यष्टीरक्षक मोहम्मद रिझवान यांची केली, ज्यावर भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने तिखट शब्दात उत्तर दिले आहे.

पाकिस्तानी पत्रकार फरिद खान यांनी ट्वीट केले की 'एमएस धोनी की मोहम्मद रिझवान? कोण सर्वोत्तम आहे? प्रमाणिकपणे सांगा.

या ट्वीटवर हरभजनने उत्तर देताना लिहिले, 'आजकाल तू काहीपण बोलतोय का? काय मुर्खासारखा प्रश्न विचारला आहेस. भावांनो, याला सांगा, धोनी खूप पुढे आहे रिझवानपेक्षा. तू जरी रिझवानला विचारले, तरी तो याचं प्रामाणिकपणे उत्तर देईल. मला रिझवान आवडतो, तो चांगला खेळाडू आहे. पण तुलना चूकीची आहे. आत्ताच्या जागतिक क्रिकेटमध्येही धोनी अव्वल आहे. स्टम्पमागे त्याच्यापेक्षा चांगलं कोणीच नाही.'

दरम्यान, धोनी हा भारताचा तीन आयसीसी ट्रॉफी जिंकणारा एकमेव कर्णधार आहे. याशिवाय तो यष्टीरक्षक फलंदाज म्हणूनही यशस्वी आहे.

त्याने 538 आंतरराष्ट्रीय सामने खेळताना ४४.९६ च्या सरासरीने १७२६६ धावा केल्या आहेत. यामध्ये १६ शतकांचा आणि १०८ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच यष्टीरक्षक म्हणून 829 विकेट्स घेतल्या आहेत, ज्यात ६३४ झेल आणि १९५ यष्टीचीत आहेत.

रिझवानबद्दल सांगायचे झाले, तर त्याने आत्तापर्यंत २०६ आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून ४३.८५ च्या सरासरीने ६ शतके आणि ५१ अर्धशतकांसह ७०१७ धावा केल्या आहेत. तसेच यष्टीरक्षक म्हणून २०१ विकेट्स घेतल्या आहेत, ज्यात १८४ झेल आणि १७ यष्टीचीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayodhya Ram Temple: अयोध्येत राम मंदिर परिसरात नमाज पठण करण्याचा प्रयत्न! विश्वस्त मंडळाकडून सुरक्षा व्यवस्थेत होणार मोठे बदल

विरोधात उभा रहायची हिंमत कशी केलीत? पिंपरीत भाजप कार्यकर्त्यांचा मध्यरात्री राडा, घरात घुसून शिवीगाळ

ताजमहालचे खास तळघर उघडणार! मोफत पाहण्याची एकमेव संधी; जाणून घ्या ३ दिवसांचे वेळापत्रक

Maharashtra Dry Day राज्यात २९ ठिकाणी ४ दिवस ड्राय डे, १३ ते १६ जानेवारीपर्यंत मद्यपानास मनाई

Latest Marathi News Live Update : इस्रोचे मिशन अयशस्वी, कक्षेत पोहोचण्यापूर्वीच 'अन्वेषा' अवकाशात गायब

SCROLL FOR NEXT