Hardik Pandya Natasa Stankovic divorced News sakal
Cricket

Hardik Pandya divorced : हार्दिक पांड्याचा झाला घटस्फोट? पत्नी नताशा घेणार 70 टक्के प्रॉपर्टी.... सोशल मीडियावर रंगली चर्चा

Hardik Pandya Natasa Stankovic divorced News : भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याबाबत एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.

Kiran Mahanavar

Hardik Pandya and Natasa Stankovic : भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याबाबत एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. आत्ताच एक दिवसापूर्वी बातमी आली होती की हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक घटस्फोट घेणार आहेत.

आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे की, घटस्फोट घेण्यासाठी नताशा स्टॅनकोविक हार्दिक पांड्याची 70 टक्के संपत्ती नावावर करून घेणार आहे. याबाबत अद्याप कोणतीही पुष्टी मिळालेली नाही मात्र सोशल मीडियावर अशा बातम्या व्हायरल होत आहेत.

गेल्या काही काळापासून हार्दिक पांड्याचे दिवस खराब चालू आहे. आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद स्वीकारणाऱ्या हार्दिकसाठी संपूर्ण हंगाम खूपच वाईट गेला. त्याच्या नेतृत्वाखाली संघ साखळी टप्प्यातील 14 पैकी फक्त 4 सामने जिंकू शकला. त्याचवेळी आता त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बातम्या येत आहेत की तो पत्नी नताशापासून घटस्फोट घेणार आहे.

पांड्या आणि नताशा बरेच दिवस झाले एकत्र दिसले नाहीत. दोघांनी 14 फेब्रुवारीला इंस्टाग्रामवर शेवटचा फोटो शेअर केला होता. मात्र, यानंतर दोघेही एका कार्यक्रमाच्या व्हिडिओमध्ये एकत्र दिसले. पण आता घटस्फोटाच्या बातम्यांनी जोर पकडला आहे.

रिपोर्टनुसार, पांड्याला त्याच्या संपत्तीतील 70 टक्के नताशाला द्यावी लागेल. यासंदर्भात अनेक पोस्ट सोशल मीडियावर शेअरही करण्यात आल्या आहेत. पांड्या करोडोंच्या मालमत्तेचा मालक आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका यूजरने दावा केला की ते दोघे वेगळे झाले आहेत आणि लिहिले की, 'हार्दिक आणि नताशा एकमेकांच्या स्टोरी पोस्ट करत नाहीत. नताशा इन्स्टाग्रामवर तिच्या प्रोफाइलमध्ये पांड्या आडनावही लिहायची. पण आता तिने पंड्या आडनाव काढून टाकले आहे.

हार्दिक पांड्या किती कमावतो?

पांड्या आयपीएल टीम मुंबई इंडियन्सचा भाग आहे. त्याला संघाकडून फी म्हणून 15 कोटी रुपये मिळतात. यापूर्वी तो गुजरात टायटन्सचा भाग होता. गुजरातचा संघही पंड्याला तेवढीच रक्कम द्यायचा. यासोबतच त्याला भारतीय क्रिकेट संघाकडून मॅच फी देखील मिळते. पांड्याची कमाई करोडोंमध्ये आहे. यासोबतच ते ब्रँड एंडोर्समेंटमधूनही कमाई करतात.

वडोदरा आणि मुंबईत करोडोंची घरे

हार्दिक पांड्याने मुंबईत एक अपार्टमेंट घेतला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांनी हे घर 30 कोटी रुपयांना विकत घेतले होते. यासोबतच त्यांचे वडोदरा येथे पेंटहाऊस आहे. त्याची किंमतही करोडोंमध्ये आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT