hardik pandya breaks BCCI rule played logo in any domestic competition
hardik pandya breaks BCCI rule played logo in any domestic competition  sakal
क्रिकेट

Hardik Pandya : हेल्मेटमुळे मुंबई इंडियन्सचा कर्णधार पांड्या सापडला अडचणीत? मोडला BCCI चा मोठा नियम

Kiran Mahanavar

Hardik Pandya : भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या गेल्या काही काळापासून कोणत्या ना कोणत्या कराणांसाठी चर्चेत असतो. आधी तो अचानक आयपीएल ट्रेडमधून गुजरात टायटन्स सोडून मुंबई इंडियन्समध्ये परतला. त्यानंतर रोहितला कर्णधारपदावरून हटवल्यावर खुद्द मुंबई इंडियन्सनंचं पांड्या कर्णधार झाल्याची घोषणा केली. तेव्हा यावरूनही सोशल मीडियावर गदारोळ झाला होता. पण आता हार्दिक पांड्या पुन्हा एका नव्या वादात सापडला आहे. आणि त्याच्यावर बीसीसीआयचे नियम मोडल्याचा आरोप होत आहे.

खरंतर, हार्दिक पांड्याने गेल्या पाच महिन्यांपासून क्रिकेट खेळलेले नाही. तो 2023 च्या एकदिवसीय वर्ल्ड कपमधून बाहेर पडला, तेव्हापासून तो मैदानातून बाहेर होता. आता आयपीएल 2024 जवळ आल्याने त्याने स्वत:ला फिट केले आहे.

दरम्यान, आयपीएलपूर्वी तो महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विशेष स्पर्धेत खेळण्यासाठी आला होता. रिलायन्स संघाकडून खेळताना हार्दिक जेव्हा फलंदाजीला आला तेव्हा त्याच्याकडून मोठी चुक झाली.

हार्दिकने कोणता नियम मोडला?

हार्दिक पांड्या डीवाय पाटील स्पर्धेत फलंदाजीसाठी आला, तेव्हा त्याच्या हेल्मेटवर बीसीसीआयचा लोगो होता आणि खाली तिरंगा होता. पण बीसीसीआयच्या नियमांनुसार कोणत्याही खेळाडूला कोणत्याही देशांतर्गत स्पर्धेत बीसीसीआयचा लोगो वापरता येत नाही.

हा लोगो तेव्हाच वापरला जातो, जेव्हा खेळाडूला बीसीसीआयने निवडलेल्या संघात खेळण्याची संधी मिळते. खेळाडू कोणत्याही अंडर-19 देशांतर्गत स्पर्धा, रणजी, सय्यद मुश्ताक किंवा इतर कोठेही बीसीसीआयचा लोगो असलेले हेल्मेट वापरू शकत नाही. हे आम्ही म्हणत नसून बीसीसीआयचा नियम सांगत आहे. आता हार्दिकने हा नियम मोडला असून तो भविष्यात कोणत्या अडचणीत सापडतो, त्याच्यावर कारवाई होते की नाही, हे पाहणे बाकी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : मुख्यमंत्री शिंदेंच्या गडात सर्वात कमी मतदान? जाणून घ्या ५ वाजेपर्यंत महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी

Ebrahim Raisi : इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमुळं भारतात उद्या राष्ट्रीय दुखवटा जाहीर

Helmet Man : दागिने, घर, जमीन विकून हा व्यक्ती लोकांना फुकटात वाटतोय हेल्मेट,राघवेंद्रचे होतंय कौतूक

Uddhav Thackeray : ''मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांची नावं लिहून घ्या, त्यांची नावं जाहीर करुन कोर्टात धाव घेणार'', उद्धव ठाकरेंनी का दिला इशारा?

Swati Maliwal Rajya Sabha Membership: 'आप'शी पंगा घेतल्यानंतर स्वाती मालीवालांना गमवावं लागणार राज्यसभा सदस्यत्व? काय सांगतो नियम

SCROLL FOR NEXT