Hardik Pandya Natasa Stankovic Divorce Property Update sakal
Cricket

Hardik Pandya-Natasa Divorce : आता हार्दिक पांड्याच्या संपत्तीचे काय होणार... नताशा किती पोटगी घेणार? जाणून घ्या A टू Z

Hardik Pandya confirms divorce with Natasa Stankovic : हार्दिकच्या मालमत्तेत नताशा स्टॅनकोविचचा हक्क असेल का?

Kiran Mahanavar

Hardik Pandya Natasa Stankovic Divorce Property Update : अखेर ज्याची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होती ती घटना सत्य ठरली. हार्दिक पंड्या आणि नताशा यांचा घटस्फोट झाला. हार्दिकने सोशल मीडियावरून या घटनेची माहिती आज उघड केली.

गेल्या चार वर्षांपासून असलेल्या नात्यातून आम्ही विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्यण घेणे फार कठीण होते. आमच्या दोघांसाठी सर्वस्व असलेला आमचा मुलगा अगस्त्य याचे आम्ही सहपालक म्हणून कायम राहू. या कठीण काळात आमच्या खासगी आयुष्यात एकांत द्याल, अशी मी विनंती करतो, असे हार्दिकने म्हटले आहे.

हार्दिक आणि नताशा यांच्यातील संबंध दूर होत असल्याची कुणकूण आयपीएलपासून लागली होती. आयपीएलमध्ये ती एकाही सामन्यासाठी उपस्थित नव्हती, तसेच टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत बहुतेक खेळाडूंच्या पत्नी अमेरिका -वेस्ट इंडीजमध्ये संघासोबत होत्या, परंतु हार्दिक पंड्या एकटाच असल्याचे दिसून येत होते.

श्रीलंका दौऱ्यासाठी संघ निवड झाल्यानंतर काही वेळातच हार्दिकने इंस्ट्राग्रामवरून ही घटना जाहीर केली. अशा परिस्थितीत हार्दिक पांड्याच्या मालमत्तेचे काय होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. हार्दिकच्या मालमत्तेत नताशा स्टॅनकोविचचा हक्क असेल का? ती किती पोटगी घेऊ शकते?...

अहमदाबाद मिररच्या एका रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, घटस्फोटानंतर हार्दिकला त्याच्या संपत्तीतील 70 टक्के भाग नताशाला द्यावा लागेल अशी अफवा आहे. आता अशा परिस्थितीत हार्दिककडे किती कोटींची संपत्ती आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. तर आम्ही तुम्हाला सांगतो की तो एकूण 91 कोटी रुपयांच्या मालमत्तेचा मालक आहे.

हार्दिकचे मुंबईत 30 कोटी रुपयांचे आलिशान घर आहे. याशिवाय त्यांचे वडोदरा येथे एक आलिशान घर आहे. तर त्याच्याकडे अनेक आलिशान गाड्या आहेत. अफवांच्या मते, जर हार्दिकला त्याच्या संपत्तीतील 70 टक्के रक्कम त्याच्या पत्नीला द्यावी लागली तर त्याला एकूण 62 कोटी रुपयांचे नुकसान होईल.

पण एक रंजक गोष्ट म्हणजे घटस्फोटापूर्वीही हार्दिक पांड्याने त्याच्या संपत्तीतील 50 टक्के रक्कम आईच्या नावावर केली आहे. नुकताच त्याचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला होता. ज्यामध्ये तो सांगतो की त्याने त्याच्या घरापासून त्याच्या कारपर्यंत सर्व काही त्याच्या आईच्या नावावर घेतले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT