IPL 2024 mi vs gt  sakal
Cricket

IPL 2024 mi vs gt : मुंबईच्या सामन्यात हार्दिकची हुर्यो ; आयपीएल : गुजरात टायटन्सचा सहा धावांनी निसटता विजय

मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी रोहित शर्माऐवजी नियुक्ती करण्यात आल्यापासून ट्रोल करण्यात आलेल्या हार्दिक पंड्यासाठी मुंबई आणि गुजरात यांच्यात रविवारी झालेल्या सामन्यात प्रेक्षकांच्या मोठ्या विरोधाचा सामना करावा लागला.

सकाळ वृत्तसेवा

अहमदाबाद : मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी रोहित शर्माऐवजी नियुक्ती करण्यात आल्यापासून ट्रोल करण्यात आलेल्या हार्दिक पंड्यासाठी मुंबई आणि गुजरात यांच्यात रविवारी झालेल्या सामन्यात प्रेक्षकांच्या मोठ्या विरोधाचा सामना करावा लागला. संपूर्ण सामन्यात त्याची हुर्यो उडवण्यात आली. सोशल मीडियावरही तो फार मोठ्या प्रमाणात ट्रोल होत होता.

मूळचा गुजरात राज्यातील खेळाडू असूनही अहमदाबादमध्येच हार्दिकला प्रेक्षकांचा सहन करावा लागलेला विरोध याचे आश्चर्य काही परदेशी माजी खेळाडूंना वाटले. रोहितला कर्णधारपदावरून दूर करण्यात आल्यामुळे मुंबईचे आणि गुजरात संघ सोडल्यामुळे गुजरातचे प्रेक्षक असे सर्व जण हार्दिकच्या विरोधात असल्याचे चित्र होते.

रविवारी झालेल्या या सामन्यात मुंबईला प्रथम गोलंदाजी करावी लागली आणि जसप्रीत बुमरासारखा विश्वविख्यात वेगवान गोलंदाज असताना हार्दिकने स्वतः प्रथम गोलंदाजी स्वीकारली आणि पहिल्याच षटकात ११ धावा दिल्या. तो गोलंदाजीस आल्यापासून नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये असलेल्या लाखभर प्रेक्षकांनी हार्दिकला टार्गेट केले. बुमराला का गोलंदाजी दिली नाही, असा प्रश्न इंग्लंडचे माजी कर्णधार राहिलेल्या समालोचक केविन पीटरसन यांनी केला. सुनील गावसकर यांनीही आपल्यासही हा प्रश्न पडल्याचे याप्रसंगी सांगितले.

मुंबईच्या डावाच्या अखेरच्या षटकांत हार्दिकने रोहित शर्माला क्षेत्ररक्षणासाठी सीमारेषेवर पाठवले. अशा ठिकाणी रोहित क्षेत्ररक्षण करत नाही. सामना सुरू होण्याअगोदर नरेंद्र मोदी स्टेडियमच्या बाहेर मोठ्या संख्येने मुंबई इंडियन्सचे पाठीराखे होते, ते सर्व जण रोहित... रोहित असा नारा देत होते. १६९ धावांच्या आव्हानासमोर रोहित शर्माने आपल्या नेहमीच्या शैलीत फलंदाजी करताना २९ चेंडूत ४३ धावांची खेळी केली. बाद होऊन तो परतत असताना डगआऊटमध्ये उभ्या असलेल्या हार्दिकने टाळ्या वाजवत रोहितला शाबासकी देण्याचा प्रयत्न केला; परंतु रोहितने त्याच्याकडे लक्ष दिले नाही, असाही एक व्हिडिओ व्हायरल होत होता.

या सामन्यात हार्दिक स्वतः सातव्या क्रमांकावर फलंदाजीस आला, त्याबद्दलही आश्चर्य व्यक्त करण्यात आले. हार्दिकला या क्रमांकावर फलंदाजीस पाठवण्याचा निर्णय आम्हा सर्वांचा एकत्रित होता, असा खुलासा मुंबई संघाचे फलंदाजी प्रशिक्षक कायरन पोलार्ड यांनी केला. तसेच हार्दिकने बुमरा आणि कोएत्झी यांच्याऐवजी स्वतः प्रथम गोलंदाजी करण्याच्या निर्णयाचेही पोलार्ड यांनी समर्थन केले. गुजरात संघातून खेळताना हार्दिकने अशीच गोलंदाजीची सुरुवात केली होती. त्याचे चेंडू त्यावेळी स्वींग होत होते. आताही चेंडू स्वींग होईल या विचाराने त्याने सर्वांच्या अगोदर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, असे पोलार्ड म्हणाले.

अजून १३ सामने आहेत

गुजरातविरुद्धचा हा सामना सहा धावांनी गमावल्यामुळे मुंबईची आयपीएलमध्ये सलामीचा सामना गमावण्याची ‘परंपरा’ कायम राहिली. पहिला सामना गमावला असला तरी फार चिंता करण्याची गरज नाही, असून १३ साखळी सामने आहेत, असे हार्दिकने सांगितले. एरवी अखेरच्या पाच षटकांत ४२ धावा सहज पार करण्याची आमची क्षमता आहे; परंतु कधी कधी एखादा दिवस आमचा नसतो, असेही तो म्हणाला. प्रेक्षकांना चांगल्या सामन्याचा आनंद मिळाला. हे स्टेडियम असे आहे जेथे प्रेक्षकांच्या जल्लोषात खेळण्याचा आनंद मिळतो.

- हार्दिक पंड्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT