India Team leaves for Sri Lanka Tour Sakal
Cricket

नवा कोच, नवा कर्णधार! Hardik Pandya ची मिठी अन् टीम इंडियाची श्रीलंका दौऱ्यासाठी भरारी, video

India Cricket Team leave for Sri Lanka Tour: भारतीय क्रिकेट संघ सोमवारी श्रीलंका दौऱ्यासाठी रवाना झाला आहे.

Pranali Kodre

India Tour of Sri Lanka 2024: भारतीय क्रिकेट संघ सोमवारी श्रीलंका दौऱ्यासाठी रवाना झाला आहे. भारतीय संघाला २७ जुलैपासून श्रीलंकेविरुद्ध ३ टी२० आणि ३ वनडे सामन्यांची मालिका खेळायची आहे.

या दौऱ्यासाठी भारतीय संघ आणि सपोर्ट स्टाफमधील सदस्य सोमवारी मुंबईत एकत्र आहे, त्यानंतर त्यांनी श्रीलंकेची वाट धरली. यादरम्यानचा व्हिडिओही सध्या समोर आला आहे.

या व्हिडिओमध्ये हार्दिक पांड्या सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायरला कडाडून मिठी मारतानाही दिसत आहे. त्याचबरोबर शुभमन गिल, रिंकु सिंग, क्षेत्ररक्षक प्रशिक्षक टी दिलीप हे देखील दिसत आहेत.

का महत्त्वाचा आहे श्रीलंका दौरा?

भारतीय संघाने जूनच्या अखेरीस रोहित शर्माच्या नेतृत्वात आणि राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली टी२० वर्ल्ड कप विजेतेपदावर नाव कोरले. पण या स्पर्धेनंतर आता भारतीय संघात मोठे बदल झाले आहे.

राहुल द्रविड आणि त्याच्या सपोर्ट स्टाफचा कार्यकाळ या स्पर्धेनंतर संपला. त्याच्या सपोर्ट स्टाफमधील केवळ टी दिलीप हे आता भारतीय संघाचे क्षेत्ररक्षक प्रशिक्षक म्हणून कायम आहेत.

याशिवाय श्रीलंका दौऱ्याआधी आता भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षकपद गौतम गंभीरकडे आले असून त्याच्या सपोर्ट स्टाफमध्ये अभिषेक नायर आणि रायन टेन डोईशेट हे सहाय्यक प्रशिक्षक असणार आहेत.

इतकेच नाही, तर टी२० वर्ल्ड कपनंतर विराट कोहली, रोहित शर्मा आणि रविंद्र जडेजा यांनी आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असल्याने ते देखील टी२० संघाचा भाग नाहीत. टी२० संघाने कर्णधारपद सूर्यकुमार यादवकडे देण्यात आले आहे.

तसेच वनडेचे कर्णधारपद रोहितकडे कायम असले, तरी वनडे आणि टी२० या दोन्ही संघांचे उपकर्णधारपद शुभमन गिलकडे सोपवण्यात आले आहे. त्यामुळेच संघात झालेले अनेक बदल आणि नवा सपोर्ट स्टाफ, हे पाहाता श्रीलंका दौऱ्याकडे अनेक भारतीय चाहत्यांचे लक्ष असणार आहे.

असा असेल श्रीलंका दौरा

भारतीय संघ श्रीलंकाविरुद्ध २७, २८ आणि ३० जुलै या तीन दिवशी अनुक्रमे टी२० मालिकेतील पहिला, दुसरा आणि तिसरा सामना खेळेल.टी२० मालिकेतील सर्व सामने पाल्लेकेले येथे होतील. त्यानंतर वनडे मालिकेतील पहिला, दुसरा आणि तिसरा सामना अनुक्रमे २, ४ आणि ७ ऑगस्ट रोजी खेळवले जाणार आहेत. वनडे मालिकेतील सर्व सामने कोलंबोमध्ये होणार आहेत.

श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ

वनडे संघ - रोहित शर्मा ( कर्णधार), शुभमन गिल ( उप कर्णधार), विराट कोहली, लोकेश राहुल, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलिल अहमद, हर्षित राणा.

टी-२० संघ - सूर्यकुमार यादव ( कर्णधार), शुभमन गिल ( उप कर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, ऋषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलिल अहमद, मोहम्मद सिराज.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT