BCCI Central Contract Sarfaraz Khan Dhruv Jurel Marathi News sakal
Cricket

BCCI Central Contract : करारात नाही तरी... सर्फराज खान अन् ध्रुव जुरेल होणार मालामाल! BCCIने बनवला खास नियम

BCCI Central Contract Sarfaraz Khan Dhruv Jurel : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) बुधवारी खेळाडूचा वार्षिक केंद्रीय करार जारी केला आहे.

Kiran Mahanavar

BCCI Central Contract Sarfaraz Khan Dhruv Jurel : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) बुधवारी खेळाडूचा वार्षिक केंद्रीय करार जारी केला आहे. 2023-24 या वर्षासाठी जारी करण्यात आलेल्या या करारामध्ये सध्या 30 खेळाडूंना स्थान मिळाले आहे.

पण त्याशिवाय काही नावे प्रस्तावित असल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे. याशिवाय मंडळाने विशेष नियमही केला आहे. याअंतर्गत सर्फराज खान आणि ध्रुव जुरेल या खेळाडूंनाही केंद्रीय करारामध्ये प्रवेश मिळणार आहे. आतापर्यंत या दोन्ही खेळाडूंनी प्रत्येकी दोन कसोटी सामने खेळले आहेत.

बीसीसीआयने बनवला खास नियम

बीसीसीआयने आपल्या विशेष नियमात म्हटले आहे की, 2024 च्या या ताज्या कराराच्या कालावधीत ज्या खेळाडूंनी किमान 3 कसोटी सामने किंवा 8 एकदिवसीय सामने किंवा 10 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, त्यांनाच या करारात स्थान मिळेल.

याअंतर्गत श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांना वगळण्यात आले आहे. सर्फराज खान आणि ध्रुव जुरेल यांनी धर्मशाळा येथे पाचवी कसोटी खेळल्यास त्यांना आपोआप सी ग्रेडमध्ये प्रवेश मिळेल, अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे. सध्या बीसीसीआयने 15 खेळाडूंना सी ग्रेडमध्ये स्थान दिले आहे. या श्रेणीतील खेळाडूंना वर्षाला एक कोटी रुपये मिळतात.

या युवा खेळाडूंना लागली लॉटरी

बीसीसीआयने प्रथमच अनेक युवा खेळाडूंना केंद्रीय करारामध्ये स्थान दिले आहे. त्या खेळाडूंची नावे पुढीलप्रमाणे रिंकू सिंग, यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड, रजत पाटीदार, जितेश शर्मा, रवी बिश्नोई, शिवम दुबे, तिलक वर्मा, केएस भरत, मुकेश कुमार.

जागा कोणाला मिळाली?

ग्रेड A+ : रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा.

ग्रेड A : रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, केएल राहुल, शुभमन गिल आणि हार्दिक पांड्या.

ग्रेड ब : सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि यशस्वी जैस्वाल.

ग्रेड सी : रिंकू सिंग, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकूर, शिवम दुबे, रवी बिश्‍नोई, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, मुकेशकुमार, संजू सॅमसन, अर्शदीप, के. एस. भारत, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, रजत पाटीदार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni: कॅप्टनकूलने ४४ वा वाढदिवस कुटुंबासोबत केला साजरा, आई-बाबाही होते उपस्थित; Video आला समोर

Latest Maharashtra News Updates : कोथरुड येथे खिडकीतून पडणाऱ्या मुलीला जवानाने वाचवले

Viral Video: ६ चेंडू, ६ विकेट्स! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये अविश्वसनीय विक्रम, इंग्लंडमध्ये घडला २४ तासांत अजब पराक्रम...

Maharashtra Assembly Session: 'ओम फट स्वाहा...' विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांची टोलेबाजी; नितेश राणेंना म्हणाले...

बायकोसाठी कायपण ! नंदिनीला मनवण्यासाठी रिक्षावाला झाला जीवा; तर पार्थसाठी काव्या...; नवा प्रोमो पाहून नेटकरी खुश

SCROLL FOR NEXT