Team India T20 World Cup prize money Split sakal
Cricket

T20 WC Prize Money Split : टीम इंडियामध्ये 125 कोटींची झाली वाटणी.... खेळाडूंपासून ते सिलेक्टरपर्यंत कोणाला मिळणार किती पैसे?

T20 World Cup Prize Money Indian Team : भारतीय संघाने टी-20 वर्ल्ड कप 2024 ची ट्रॉफी जिंकली आणि 11 वर्षांचा आयसीसी विजेतेपदाचा दुष्काळ संपवला.

Kiran Mahanavar

Team India T20 World Cup prize money Split : भारतीय संघाने टी-20 वर्ल्ड कप 2024 ची ट्रॉफी जिंकली आणि 11 वर्षांचा आयसीसी विजेतेपदाचा दुष्काळ संपवला. फायनलमध्ये टीम इंडियाने चांगली कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करत विश्वविजेतेपद पटकावले. भारतीय संघाच्या या ऐतिहासिक यशानंतर बीसीसीआयने संघावर पैशांचा वर्षाव करत 125 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले.

टीम इंडियाला आयसीसीकडून बक्षिसाची रक्कम तर मिळालीच पण बीसीसीआयने 125 कोटी रुपयांचे वेगळे बक्षीसही जाहीर केले. आता टीम इंडियामध्ये 125 कोटींची वाटणी झाली आहे. खेळाडूंपासून ते सिलेक्टरपर्यंत कोणाला किती पैसे मिळणार हे जाणून घेऊया...

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, सर्व 15 खेळाडू आणि राहुल द्रविड यांना प्रत्येकी 5 कोटी रुपये मिळणार आहेत. याशिवाय उर्वरित कोचिंग स्टाफला प्रत्येकी 2.5 कोटी रुपये मिळतील. तर बाकीच्या स्टाफला प्रत्येकी 2 कोटी रुपये मिळतील. निवड समितीच्या प्रत्येक सदस्याला प्रत्येकी एक कोटी रुपये मिळणार आहेत. रिंकू सिंग आणि शुभमन गिल या खेळाडूंसह राखीव गटातील खेळाडूंनाही प्रत्येकी एक कोटी रुपये देण्यात येणार आहेत.

भारतीय संघाने 13 वर्षांनंतर वर्ल्ड कप जिंकला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने बार्बाडोसमध्ये इतिहास रचला. अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव केला. टीम इंडिया प्रत्येक वेळी उपांत्य फेरीत किंवा अंतिम फेरीत हरली. याच कारणामुळे या वेळी जेव्हा संघाने अंतिम सामना जिंकला तेव्हा संपूर्ण देशांनी जल्लोष केला.

भारताने टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर 2007 प्रमाणे विजयाची परेड मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथे एका खुल्या बसमध्ये झाली आणि त्यादरम्यान लाखो चाहते उपस्थित होते. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरही एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आणि त्यादरम्यान स्टेडियम पूर्णपणे खचाखच भरले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat Rain Update: गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार, २४ तासांत तब्बल १०६४ मिमीची नोंद; तिसऱ्या क्रमांकाचा विक्रम

Maharashtra Farm Loan Waiver : पुणे जिल्ह्यातील 61,900 शेतकऱ्यांना 533 कोटींची कर्जमाफी; दुसरी यादी जाहीर, तुमचं नाव आहे का?

Latest Marathi News Live Update : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर आंदोलनाचं काय होणार? CJP चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी स्पष्टच सांगितलं

Pune Rain Update: पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट; खडकवासला धरण १०० टक्के भरले, चारही धरणांत किती टक्के पाणीसाठा?

Trump Tariffs : डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतासह ६० देशांना झटका, नवीन टॅरिफ जाहीर; व्यापारावर होणार परिणाम

SCROLL FOR NEXT