T20 World Cup 2024 Ambassador
T20 World Cup 2024 Ambassador Sakal
क्रिकेट

वेगाचा बादशाह बनला T20 World Cup चा ब्रँड अँबेसिडर, देशासाठी जिंकलीत 8 ऑलिम्पिक सुवर्ण पदकं

प्रणाली कोद्रे

T20 World Cup 2024: इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल 2024 स्पर्धा संपल्यानंतर जून 2024 मध्ये टी20 वर्ल्डकपचा थरार रंगणार आहे. यंदाचा टी20 वर्ल्डकप वेस्ट इंडिज आणि अमेरिका येथे खेळवण्यात येणार आहे. 20 संघ सहाभागी होणार असलेल्या या स्पर्धेला 1 जूनपासून सुरुवात होईल, तर 29 जूनला अंतिम सामना होणार आहे.

दरम्यान आता साधारण एक महिनात राहिला असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) या स्पर्धेबाबत मोठी घोषणा केली आहे. या स्पर्धेसाठी वेगाचा बादशाह समजला जाणारा जमैकाचा धावपटू उसेन बोल्टला ब्रँड अँबेसिडर बनवले आहे. बोल्टने ऑलिम्पिकमध्ये विक्रमी ८ वेळा सुवर्णपदक जिंकले आहे.

ज्या कॅरेबियन बेटांमधील देशांचा मिळून वेस्ट इंडिज संघ बनतो, त्यातील एक देश जमैका देखील आहे. त्यामुळे बोल्टचा क्रिकेटशी जवळून संबंधही आला आहे.

इतकेच नाही, तर तो लहानपणी क्रिकेटही खेळायचा, पण त्याच्या शाळेतल्या प्रशिक्षकांनी त्याला ऍथलेटिक्सकडे लक्ष देण्यास सांगितले, त्यामुळे तो त्याकडे वळला. वेस्ट इंडिजचा धडाकेबाज क्रिकेटपटू ख्रिस गेल हा त्याचा चांगला मित्र देखील आहे.

दरम्यान, टी20 वर्ल्डकपचा ब्रँड अँबेसिडर बनल्याबद्दल आनंद व्यक्त करताना बोल्ट म्हणाला, 'आगामी टी20 वर्ल्डकपसाठी मी अँबेसिडर झाल्याबद्दल मला आनंद आहे. मी कॅरेबियन बेटांमधील आहे, जिथे क्रिकेट आयुष्याचा एक भाग आहे. या खेळासाठी माझ्या हृदयात खास जागा आहे.

'टी20 वर्ल्डकपसारख्या प्रतिष्ठीत सामन्याचा भाग बनणे ही अभिमानाची गोष्ट आहे. वर्ल्डकपमध्ये मी माझी उर्जा आणि उत्साह घेऊन येण्यासाठी आणि जगभरात क्रिकेटच्या विकासात योगदान देण्यासाठी उत्सुक आहे.'

दरम्यान, अमेरिकेत इतकी मोठी क्रिकेट स्पर्धा होण्याची ही पहिलीच वेळ असल्याने त्याबाबतही बोल्टने उत्साह व्यक्त केला. त्याने हा विश्वासही व्यक्त केला की यशस्वी टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर अमेरिकेत क्रिकेटची मोठी छाप पडेल. तसेच ऑलिम्पिकमध्येही लवकरच क्रिकेटचाही समावेश होईल, अशी अपेक्षा बोल्टने व्यक्त केली.

टी20 वर्ल्डकपबद्दल सांगायचे झाले, तर साखळी फेरीत एकूण 20 संघ सहभागी होणार असून भारताचा समावेश ए गटात झाला आहे. या गटात आणखी अमेरिका, पाकिस्तान, आयर्लंड आणि कॅनडा हे संघही आहेत.

भारताचे साखळी फेरीतील सर्व सामने अमेरिकेत होणार आहेत. पहिला सामना 5 जून रोजी आयर्लंडविरुद्ध होणार आहे, तर 9 जून रोजी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. त्यानंतर 12 जून रोजी भारताचा सामना अमेरिकेशी होईल. साखळी फेरीतील अखेरचा सामना 15 जून रोजी कॅनडा विरुद्ध होणार आहे.

या स्पर्धेत भारताव्यतिरिक्त पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका, वेस्ट इंडिज, ओमान, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, न्यूझीलंज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी, नेपाळ, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका , बांगलादेश आणि नेदरलँड्स असे 20 संघ सहभागी होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Live News Update: मुंबईतील मतदान केंद्रांवर सुविधा नाहीत; आदित्य ठाकरेंनी व्हिडिओद्वारे मांडली समस्या

Navi Mumbai News: 13 वर्षाच्या मुलाने पॉर्न पाहून अल्पवयीन बहिणीला केलं गरोदर, पनवेलमधील धक्कादायक घटना

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: जावेद अख्तर, शबाना आझमींनी मुंबईत केले मतदान

Deepthi Jeevanji : भारत की बेटी सब पर भारी... दीप्तीने जपानमध्ये रचला इतिहास! 400 मीटर T20 शर्यतीत जिंकले 'गोल्ड मेडल'

IPL 2024: ECB ने निर्णय बदलला... हंगाम संपण्यापूर्वीच इंग्लिश खेळाडू परत जाण्याबाबत पंजाब किंग्सच्या कोचचा खुलासा

SCROLL FOR NEXT