ICC Player of The Month  esakal
Cricket

ICC Player of The Month : यादीत भारताचा एकही खेळाडू नाही, युएई अन् पाकिस्तानचे क्रिकेटर आघाडीवर

Player of The Month: There is no Indian player in the list; युएई अन् पाकिस्तानचे क्रिकेटर आघाडीवर...

अनिरुद्ध संकपाळ

ICC Player of The Month : आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊन्सीलने आज एप्रिल महिन्याचे आयसीसी मेन्स प्लेअर ऑफ द मंथच्या नॉमिनेटेड खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. या यादीत युएई, नामीबिया आणि पाकिस्तान या संघाच्या खेळाडूंचा समावेश आहे. या यादीत एकाही भारतीय खेळाडूचा समावेश आहे.

ही काही मोठी गोष्ट नाही कारण भारतीय खेळाडू हे आयपीएल खेळत आहेत. या काळात भारताने एकही आंतरराष्ट्रीय मालिका खेळलेली नाही. त्यामुळेच या यादीत भारतीय संघातील एकाही खेळाडूचा समावेश नाही.

गेरहार्ड इरासमस (नामीबिया)

आयसीसी मेन्स प्लेअर ऑफ द मंथसाठीच्या खेळाडूंच्या यादीत पहिलं नाव हे नामीबियाचा खेळाडू गेरहार्ड अरासमसचे आहे. गेरहार्ड हा नामीबियाचा कर्णधार देखील आहे. एप्रिल महिन्यात गेरहार्डने दमदार कामगिरी केली होती. त्याने टी 20 मालिकेत गोलंदाजी आणि फलंदाजीत देखील दमदार कामगिरी केली. या मालिकेत तो प्लेअर ऑफ द मॅच देखील झाला होता.

मोहम्मद वसीम (युएई)

युएईचा खेळाडू मोहम्मद वसीम एप्रिल महिन्याच्या सुरूवातीला फार काही चांगली कामगिरी करू शकला नव्हता. मात्र त्याने आपला फॉर्म परत मिळवत कुवैत विरूद्धच्या मालिकेत वसीमने तीन सामन्यात 65,48 आणि 45 अशा धावा केल्या. त्याचबरोबर एसीसी प्रीमियर कपच्या अंतिम सामन्यात वसीमने दमदार शतक देखील ठोकलं होतं.

शाहीन आफ्रिदी (पाकिस्तान)

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने न्यूझीलंडविरूद्धच्या टी 20 मालिकेत दमदार कामगिरी केली. शाहीन हा या मालिकेत पाकिस्तानकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात शाहीनच्या भेदक माऱ्यामुळं पाकिस्ताननं न्यूझीलंडला 90 धावात गुंडाळलं. या सामन्यात आफ्रिदीने 13 धावा देत 3 विकेट्स घेतल्या होत्या. पाकिस्तान आणि न्यूझीलंडची मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली.

(Cricket Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra: मान्सून जैसे थे! मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पावसाचा अंदाज; विदर्भात उष्ण लाटेचा इशारा

Shaktipeeth Highway Protest : शक्तिपीठ महामार्गाविरोधात हरकतींचा पाऊस; शेतकरी आक्रमक, ऐतवडे खुर्दमधील 182 एकर सुपीक जमीन होणार बाधित

SAFF Women Football: 'त्या' दोन पराभवांचा बदला घेणार? भारतीय महिला फुटबॉल संघासमोर बांगलादेशचे तगडे आव्हान; आजपासून थरार!

Pimpri: उद्योगनगरीत मेट्रोचा विस्तार कासवगतीने;उद्योगनगरीत मेट्रोचा विस्तार कासवगतीने

Latest Marathi News Live Update : पुणे शहरात उद्यापासून प्रतिबंधात्मक आदेश लागू; परवानगीशिवाय सभा, मिरवणुकांना बंदी

SCROLL FOR NEXT